राज्यातील मुस्लिम समाजाला 10 % टक्के आरक्षणाबरोबर शिक्षण व संरक्षण देणेबबत मुख्यमंत्र्यांना औशातून निवेदन ...
मुख्तार मणियार
औसा/ प्रतिनिधी : - राज्यातील मुस्लिम समाजाला शिक्षण, आरक्षण व संरक्षण देण्यात यावे व मुस्लिम समाजाला 10 % टक्के आरक्षण लागू करण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औसा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने दि. 18 जुन 2021 शुक्रवार रोजी दुपारी औसा नायब तहसीलदार वृषाली केसकर यांना निवेदन देण्यात आले. समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मागासलेपणा शासनाच्या निदर्शनास आणून देणारा अहवाल सादर केला सदर अहवाल मध्ये मुस्लिम समाजाची अवस्था अत्यंत बिकट असून मागास प्रवर्ग पेक्षाही खालच्या दर्जाचे असल्याने वेळोवेळी निष्पन्न झाले आहे. परंतु सदर अहवाल हे केवळ कागदोपत्रीच राहिला असून शासन दरबारी मात्र आरक्षणाच्या दृष्टीने अनावस्था दिसून आल्याने व मुस्लिम समाजाच्या आरक्षण शिफारशी समितीच्या अहवालानुसार माननीय उच्च न्यायालयानेही मुस्लिम समाजास शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देता येईल असे मत नोंदविले होते. मुस्लिम समाज हा आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागासलेला असून मुस्लिम समाजाच्या खालील मागण्या मान्य करण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन औसा तहसिलदारामार्फत आज रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात मागण्या पुढील प्रमाणे - सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा समिती, आणि महेमुदुर रहमान समितीच्या अहवालाप्रमाणे मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि रोजगारामध्ये 10 % टक्के आरक्षण लागू करावे करण्यात यावे, मुस्लिम समाजाच्या स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण, संशोधन संस्था बर्टी, सारथी च्या धर्तीवर प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र सुरू करण्यात यावी, मुस्लिम समाजावर दिवसेंदिवस होत असलेल्या अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी "ॲट्रॉसिटी" सारख्या 'अल्पसंख्यांक अत्याचार प्रतिबंधक संरक्षण कायदा ' तयार करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, माॅब लिंचींग मध्ये मृत्यू पावलेल्या मोहसीन शेख ला न्याय देण्यात यावा तसेच माॅबलिंचींग सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी लवकरात लवकर कायदा करण्यात यावा, जिल्हा पातळीवर मुस्लिम विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा मिळण्यासाठी प्रत्येक जिल्हा व तालुक्यात हॉस्टेल ची उभारणी करण्यात यावी, तसेच संपूर्ण राज्यातील मुस्लिम समाजाला शिक्षण, आरक्षण व संरक्षण देण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा, स्वतंत्र कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच प्रत्येक क्षेत्रात मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, मुस्लिम समाजाला घटनात्मक मूलभूत अधिकार असून राज्य सरकारने लवकरात लवकर मुस्लिम समाजाला 10 % टक्के आरक्षण देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन राज्याचे माननीय मुख्यमंत्री, उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना औसा तहसिलदारामार्फत देण्यात आले आहे. या निवेदनावर शहर काझी मुजम्मिलअली काझी, मजली ए उलेमा शहराध्यक्ष मौलाना सय्यद कलिमुल्लाह शाह कादरी, जमियात उलेमा ए हिंद तालुकाध्यक्ष मौलाना अहमद सिद्दिकी, अॅड. शहानवाज पटेल, अॅड. एफ वाय पटेल, अॅड. एफ एल पटेल, अॅड. एम एस शेख, अॅड. फय्याज सय्यद, अॅड. टी एन लोहारे, अॅड. मजहर शेख, अॅड. सिराज पटेल, माजी उपनगराध्यक्ष सय्यद अब्दुल खादर, माजी नगरसेवक शेख शकील, एमआयएम तालुकाप्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, दिलावर ततापुरे, शेख, एमआयएम इन्चार्ज अफसर शेख, शेख अफसर, हमीद, शेख अहमद शेख, बी जे शेख,पप्पू शेख, सोहेल चौधरी,व बागवान यांच्या सह्या आहेत.



0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.