भाजप अल्पसंख्याक मोर्चा पदाधिकारी,* *कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश,पालकमंत्री* *ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून पक्षात* *स्वागत, पुढील कार्यास दिल्या शुभेच्छा.*

 *भाजप अल्पसंख्याक मोर्चा पदाधिकारी,*

*कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश,पालकमंत्री*

*ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून पक्षात* *स्वागत, पुढील कार्यास दिल्या शुभेच्छा.*


 



 (शुक्रवार दि. १८ जून २१)


  लातूर येथील भाजप अल्पसंख्याक मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे, सर्वधर्म समभाव, लातूर जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व यावर विश्वास ठेवत अल्पसंख्याक समाज बांधवांचा सर्वांगीण विकासासाठी शुक्रवार दि.१८ जून रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


  यामध्ये भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष पठाण अफझलखान, शहर सरचिटणीस पठाण  अफसरखान, शहर सर चिटणीस ॲड.इम्रान पटेल, भाजप शिक्षक सेलचे प्रदेश अध्यक्ष पठाण मुनिरखान, शहरसचिव शेख सलीम, शेख इम्तियाज, शेख बाबा, शहर उपाध्यक्ष हतीमभाई शेख, जमीर पठाण यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी भाजपा सोडून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश करणाऱ्या भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षाचा स्कार्प घालून पक्षात स्वागत करीत काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी पुढील पक्ष कार्यास या पदाधिकारी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.


   यावेळी मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, विरोधी पक्ष नेते ॲड..दीपक सूळ, जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲड. समद पटेल, अशोक गोविंदपूरकर, अय्युब मणियार, महेश काळे, आसिफ बागवान, युनूस मोमीन यांच्यासह काँग्रेस पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

-------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या