मुस्लिम आरक्षणा साठी मुख्यमंत्री यांना एक युवक,एक पोस्टकार्ड मोहीम......
लातुरात - मुस्लिम आरक्षणासाठी एक युवक एक पोस्टकार्ड मोहिम अंतर्गत जनजागृति करण्यात आली १)मुस्लिमांना आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्यात यावा.२)मॉबलिंचिंग केलेल्या मोहसीन शेखला न्याय देण्यात यावा,मॉब लिंचिंग विरुद्ध कायदा तयार करावा.
३)प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारण्यात यावे.
४)बार्टी आणि सारथी च्या धर्तीवर मुस्लिम मुला-मुलींना यूपीएससी,एमपीएससीसाठी संस्था स्थापन करण्यात यावी.
५)मौलाना आझाद अल्पसंख्याक अर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ करण्यात यावी.
६)राज्यातील वक्फ जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ काढण्यात यावेत आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच बळकटीकरण करण्यात यावं.वक्फ संपत्तीचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा.
अशा मागणीसाठी मा. श्री. उद्धव ठाकरे साहेब, (मुख्यमंत्री,महाराष्ट्र शासन) 6 वा मजला, मुख्य इमारत,डॉ.मादाम कामा रोड,
मंत्रालय. मुंबई -
मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर जनजागृती.घराघरात मुस्लिम आरक्षण प्रश्नांच गांभीर्य निर्माण करणे.लढा असेल सर्व पक्षीय,सर्व समावेशक,नियोजनबद्ध महाराष्ट्र सर्व युवकांना ह्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन सकल मुस्लिम समाज च्या वतीने करण्यात आले आहे ...


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.