*प्रतिनिधी अल्ताफ शेख उस्मानाबाद
सातबाऱ्याचा उतारा ! - आता बँकांमध्येही मिळणार - शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट*
राज्याच्या महसूल विभागाने आपल्या नव्या संकेतस्थळासाठी ५२ बँकांशी करार केला - आता या बँकांमधून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, खाते उतारा व फेरफार ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होंणार आहे
*कोणत्या आहेत बँका ?*
● राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार - यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, पंजाब व सिंध बँक, जनता सहकारी बँक सातारा, सिडको-महाराष्ट्र बँक - इत्यादी अनेक बँकांचा समावेश आहे
● *तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये* - बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया - तसेच खासगी बँकांमध्ये कोटक महिंद्रा, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय बँक आहे
● *जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये-* कोल्हापूर, जळगाव, बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, सातारा, पुणे, गोंदिया, रत्नागिरी, नगर, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, लातूर, धुळे -
● तसेच नंदुरबार, बुलढाणा, परभणी, सांगली, ठाणे, सोलापूर आणि नाशिक या बँकांनी महसूल विभागाबरोबर करार केला आहे असे राज्य शासनाने सांगितले
*शेतकऱ्यांना सातबारा बँकांमध्येही मिळणार* - प्रत्येक शेतकऱ्यांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे ,

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.