वाढत्या हल्ल्याच्या विरोधात आज देशभरात इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे डॉक्टरांनी राष्ट्रीय निषेध दिन म्हणून नोंदविला
डॉक्टर आणि आरोग्य सेवकांवरील वाढत्या हल्ल्याच्या विरोधात आज देशभरात इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे डॉक्टरांनी राष्ट्रीय निषेध दिन म्हणून नोंदविला आहे. तसेच डॉक्टरांवरील हल्ल्याच्या विरोधात केंद्रीय आरोग्य सेवा रक्षक कायदा लागू करण्याची मागणीही डॉक्टरांनी आज केलेल्या आंदोलनातून केली आहे. जीव वाचविणाऱ्यांचा जीव वाचवा असे म्हणत लातूरमध्येही अनेक डॉक्टरांनी रस्त्यावर उतरून हे आंदोलन केलंय. लातूर जिल्हा मेडिकल असोसिएशन तर्फे काळ्या फिती बांधून लातूरच्या सह्याद्री क्रिटिकल केअरपुढे हे आंदोलन करण्यात आलं. कोरोना काळात अनेक डॉक्टर आणि आरोग्य सेवकांवरील हल्ल्यात वाढ झाल्याचे या आंदोलनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आलं

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.