ओबीसीच्या आरक्षणासाठी समता परिषदेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
अल्ताफ़ शेख प्रतिनिधी
जून २१, २०२१
उस्मानाबाद :- ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने उस्मानाबाद येथे रस्ता रोको करण्यात आला, आरक्षण कायम ठेवावे यासाठी आंदोलकांनी घोषणाबाजी करून रस्ता रोको केला.
प्रशासकीय पदोन्नती मध्ये आरक्षण कायम ठेवावे व ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसीचे राजकिय आरक्षण रद्ध झाले असुन ते पुन्हा द्यावे व तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेऊ नये, जातीनिहाय जनगनना करावी , नौकरीतील पदोन्नती आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी समता परिषदेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्र 52 वर रास्तारोको आंदोलन करण्यात आले . यावेळी पोलीसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता .आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .यावेळो महादेव माळी जिल्हाध्यक्ष , बिभीषण खुने जिल्हाउपाध्यक्ष , आबासाहेब खोत समता परिषद प्रदेश चिटणीस ,नंदू शिंदे परांडा तालुकाध्यक्ष ,संतोष डोरले भूम तालुकाध्यक्ष , प्रा राजेन्द्र खडबडे कळंब तालुकाध्यक्ष , दत्ता कांबळे तुळजापूर तालुकाध्यक्ष , लक्ष्मण माने ओ बी सी राजकीय आरक्षण बचाव समिती जिल्हाध्यक्ष , धनंजय शिंगाडे बहुजन योद्धा सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष , रवी कोरे आळणीकर तेली समाज युवक प्रदेशाध्यक्ष , सचिन चौधरी ओ बी सी प्रदेश कार्यकारिणी सदस्य,नामदेव वाघमारे जिवा सेना जिल्हाध्यक्ष व इतर सर्व ओ बी सी संघटना चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.