रणरागिणी संस्थेच्या योग शिबिरास प्रतिसाद

 

रणरागिणी संस्थेच्या योग शिबिरास प्रतिसाद







लातूर : आर्ट ऑफ लिव्हिंग आणि महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र,  रणरागिणी कलापथक सेवाभावी संस्था लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त सोमवार, दिनांक 21 जून रोजी सकाळी 8 ते 9.30 या वेळेत सामूहिक योगा कार्यक्रम वीर हनुमान मंदिर ट्रस्ट साळे गल्ली, लातूर येथे पार पडला. हा कार्यक्रम कोरोनाचे  सर्व नियम पाळून झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मनपातील भाजपचे गटनेते शैलेश गोजमगुंडे, नगरसेवक ज्योती आवसकर तसेच योग गुरु विष्णू भुतडा उपस्थित होते.  शिबिर यशस्वितेसाठी रणरागिणी कलापथक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष  प्रकाश भोकरे, कांचन वाघमारे, शेख इब्राहिम, दिगंबर सोनी, धम्मशीला सूर्यवंशी, तुळजाभवानी मित्रमंडळ लातूर यांनी परिश्रम घेतले. यावेळी सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या