ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या संकल्पनेतून तीनशे झाडांचे औशात वृक्षारोपण
औसा मुख्तार मणियार/आफताब शेख
औसा : ग्रीन लातूर वृक्ष टीम यांच्यामार्फत ग्रीन औसा या संकल्पनेतून औसा मध्ये यावर्षी भव्य 2000 मोठी झाडे आणि 1000 छोटी झाडे असे एकूण तीन हजार झाडांचं पुढील काही दिवसात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.. त्या संदर्भात आज दि.20 जुन 2021 रवीवार रोजी सकाळी 6 वाजता औसा तहसिल समोर ग्रीन लातूर वृक्ष टीमचे लातूर महानगरपालिकेचे नगरसेवक इम्रानभाई सय्यद व मनमोहन जी डागा यांच्या उपस्थितीत औसा तहसिल समोर 300 झाडे लावुन वृक्षारोपण केले. यावेळी मौलाना कलीमुल्ला,काॅग्रेस कमीटीचे शहराध्यक्ष शकील शेख, माजी नगरसेवक अॅड समियोद्दीन पटेल, सामाजिक कार्यकर्ते खुन्मीर मुल्ला , अॅड शाहनवाज पटेल,आदम पठाण, जयराज कसबे,लयीकोद्दीन पटेल,शफीयोद्दीन पटेल,अजहर पटेल,मुस्ताक शेख,अल्ताफ सय्यद,जहीरोद्दिन नांदुरगे बदीयोद्दीन पटेल,सनाउल्ला दारुवाले,सयीद सावकार,पत्रकार मुख्तार मणियार, आफताब शेख, रऊफ साबेरी,मिस्बा पटेल,साकीब सावरे,शादाब हन्नुरे शेख ईसमाईल,खाजाभाई कुरेशी, पाटील सर आदी उपस्थित होते.
ग्रीन लातूर वृक्ष टीम ही मागील सात वर्षांपासून लातूर हरित करण्यासाठी प्रयत्नशील आहे..त्यांनी मागील 742 दिवसात सतत न थांबता सकाळी सहा ते नऊ दररोज असं 58000 झाडे लावून त्यापेक्षा जास्त झाडे जगवली..लातूर जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री अमितभैया देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू असलेल्या ग्रीन लातूर वृक्ष टीम . व त्याचे सदस्य डॉक्टर पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद यांच्या माध्यमातून पूर्ण लातूर जिल्हा हरित कार्यासाठी प्रयत्न चालू आहेत.या प्रयत्नाची पावती म्हणून पूर्ण लातूर जिल्हा हरित होत आहे नक्कीच पुढील काही दिवसात पूर्ण लातूर जिल्हा डॉक्टर पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद यांच्या माध्यमातून हरित होईल असा सर्व लातूरकरांना विश्वास आहे.
🌳झाडे लावा झाडे जगवा🌳





















0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.