भाजपा सरकारला हटवून राहुल गांधींना पंतप्रधान करणार लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी चा संकल्प

 

देशातील निर्दयी भाजपा सरकारला हटवून राहुल गांधींना पंतप्रधान करणार

लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चा संकल्प






लातूर प्रतिनिधी (शनिवार दि. १९ जून २१)

  आज देशाला वाचवायचे असेल तर राहुलजींच्या विचारांची आणि दुरदृष्टीची गरज आहे. हे लक्षात घेऊन लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले साहेब यांच्या सूचनेनुसार लातूरचे पालकमंत्री माननीय ना. अमित देशमुख साहेब व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली १९ जून हा "संकल्प" दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

   भारतावर गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे गंभीर संकट आहे. या काळात शेतकरी कष्टकरी हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले, देशोधडीला लागले. दिशाहीन नेतृत्वामुळे देश एका अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे मोठी हानी होऊ शकते असा इशारा देत वेळीच उपाययोजना करा अशी सूचना राहुलजींनी पंतप्रधानांना केली होती, परंतु हा जबाबदारीचा सल्ला न ऐकता देशाला हेकेखोरपणाने मरणाच्या खाईत लोटण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले. गंगा नदीत मृतदेह तरंगतानांचे भयावह दृश्य जगाने पाहिले पण भाजप सरकारने त्यातूनही काहीच बोध घेतला नाही. आज लातूर येथील महात्मा गांधी चौक येथे लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने काँग्रेसचे नेते माननीय खासदार श्री राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प दिवस साजरा करण्यात आला.

   यावेळी नरेंद्र मोदी, किसान विरोधी, जो किसानोसे टकरायेगा, वो मिट्टी में मिल जायेगा, काळा कायदा मोदींचा, शेतकऱ्यांच्या बर्बादीचा, शेतकरी विरोधी जुल्मी कायदा, फक्त अदानी/ अंबानी यांनाच याचा फायदा, माझी मशाल माझा दणका, पेटवु मोदींच्या पापाची लंका अशा घोषणा देण्यात आल्या.

   सर्वसामान्याचे कबंरडे मोडणारी महागाईचा निषेध करण्यासाठी महिला काँग्रेसच्या वतीने गगनाला भिडणाऱ्या खाद्यतेलाच्या व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ खाद्यतेल न टाकता चूल पेटवून भाजीला फोडणी देण्यात आली. तसेच यानंतर शेतकरी विरोधी असलेल्या केंद्र सरकारचे तीन कायदे जाळण्यात आले..

   यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, लक्ष्मण कांबळे, अशोक गोविंदपूरकर, ॲड. बाबसाहेब गायकवाड, दगडूसाहेब पडीले, प्रवीण पाटील, श्याम भोसले, सुपर्ण जगताप, कैलास कांबळे, रवीशंकर जाधव, सिकंदर पटेल, इम्रान सय्यद, मोहन सुरवसे, शरद देशमुख, प्रवीण सूर्यवंशी, रघुनाथ शिंदे, महेश काळे, ॲड.देविदास बोरुळे पाटील, प्रा.एकनाथ गायकवाड, प्रा. ओमप्रकाश झुरुळे, प्रा. प्रवीण कांबळे, प्रा. सुधीर अनवले, सुरेश चव्हाण, सपनाताई किसवे, स्वयं प्रभा पाटील, खाजाबानू अन्सारी, केशर ताई महापुरे, कल्पनाताई मोरे, सुलेखा कारेपुरकर, जब्बार पठाण, सचिन बंडापल्ले, सुंदर पाटील कव्हेकर, दगडूआप्पा मिटकरी, शामराव सूर्यवंशी, व्यंकटेश पुरी, सुरेश चव्हाण, संजय नीलेगावकर, गौरव काथवटे, हमीद बागवान, दत्ता सोमवंशी, अभिजीत इगे, अभिषेक पतंगे, बालाजी झिपरे, बिभीषण सांगवीकर, रणधीर सुरवसे, राज क्षीरसागर, अजित चिखलीकर, नामदेव इगे, नेताजी बादाडे, ॲड.प्रदिपसिंह गंगणे, सचिन गंगावणे, कुणाल वागज, डॉ.बालाजी साळुंके, आसिफ बागवान, मनोज पाटील, तरबेज तांबोळी, अजित काळदाते, संजय ओहोळ, राहुल गरड, सिद्धेश्वर स्वामी, बालाजी वाघमारे, शंकर पाटील, प्रताप पाटील,प्रदीप गायकवाड, हिप्परकर, युनूस शेख,कुणाल वागज, आनंद भाई वैरागे राम गोरड, करीम तांबोळी, पुनीत पाटील, संजय सूर्यवंशी शेख कलीम, सलीम उस्ताद ,हाजी मुस्तफा, सचिन मस्के सुनीत खंडागळे, यशपाल कांबळे, सत्यवान कांबळे, अमित जाधव, विजय टाकेकर, रामराजे जाधव, प्रवीण सावंत, इसरार सगरे, सत्तार शेख,अक्षय मुरळे, प्रबत पाटील, शहाजी चव्हाण, दिनेश गोजमगुंडे नागसेन, कमेगावकर, धोंडीराम यादव, राज शिरसागर, धनंजय शेळके, हंसराज जाधव, पवन सोलंकर, अविनाश बट्टेवार, राहुल डुमणे आदी उपस्थित होते.

----------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या