कोट्यवधी रुपयांच्या पीक विमा हप्ता भरून शेतकऱ्यांना झटका
औसा प्रतिनिधी
सन 2020 सालात औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सातबारा आठ अ बँक पासबुक आधार कार्ड व पीक पेरा प्रमाणपत्र सह हजारो शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयाचे हप्ते भरून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकेत भरणा केला होता. पिक विमा प्रस्ताव तयार करून हजारो शेतकऱ्यांनी खरीप 2020 चा पिक विमा भरला. परंतु वर्ष होत आले तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप खरीप पीक विम्याचे नुकसान भरपाई मिळाले नसल्याने शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा झटका बसला आहे.मागील वर्षी कापणी पूर्वीच मूग आणि उडीद पिकाची संततधार पावसामुळे नासाडी झाली होती. सोयाबीन सारखे नगदी पीक कापणी करून लावले. लावलेल्या गंजी भिजल्याने पिकाचे नुकसान झाले होते. अनेकांच्या सोयाबीन गंजी वाहून गेल्या होत्या. तर उभ्या असलेल्या पिकात पाणी गेल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची वेळेस कापणी करता आली नाही . त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकाचे फोटो काढून तालुका कृषी कार्यालयात नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्यास सांगितले होते. तथापि अनेक शेतकऱ्याकडे स्मार्टफोन नव्हते तसेच सततच्या लागलेल्या पावसामुळे बहुतांश शेतकरी नुकसान भरपाईचे अर्ज वेळेत दाखल करू शकले नाहीत. आणि अर्ज देण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला नाही .काही शेतकऱ्यांनी अर्ज दाखलही केले पण त्यांना विमा मिळाला नाही त्यामुळे औसा तालुक्यातील शेतकरी 2020 सालचा खरीप हंगामातील पीक विम्याच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.