कोवीड-१९ मुळे अनाथ झालेल्या बालकांच्या संगोपनासाठी विविध उपाययोजना राज्य सरकार ने केली घोषित

 अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद,,      






         *कोवीड-१९ मुळे अनाथ झालेल्या बालकांच्या संगोपनासाठी विविध उपाययोजना राज्य सरकार ने घोषित  केली आहे,,।  **सद्या:स्थितीत संपूर्ण देशामध्ये कोवीड-१९ या आजाराचे संक्रमण वाढलेले आहे. सदर आजाराच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात या आजाराचे संक्रमण झालेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये लाक्षणिक वाढ होताना दिसून येत आहे. कोवीड-१९ चे मोठ्या प्रमाणात होणारे संक्रमण नियंत्रीत करता यावे यासाठी राज्य शासनाने दिनांक २२ एप्रिल, २०२१ पासून संपुर्ण लॉकडाऊन घोषित केले आहे. तथापि, कोवीड- १९ संक्रमणाच्या दुस-या टप्प्यात या आजारामुळे मृत्यू पावणाऱ्या नागरीकांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. तर अनेक ठिकाणी एकाच कुटूंबातील आई आणि वडील अशा दोन्ही पालकांचा या आजारामुळे मृत्यु पावल्याच्या घटना राज्यामध्ये निदर्शनास आलेल्या आहेत. एकाच कुटूंबातील दोन्ही पालकांचा (आई आणि वडील) मृत्यु झाल्यामुळे ० ते १८ वर्ष वयोगटातील बालके पुर्णतः अनाथ होत असून दोन्ही पालकांचा मृत्यु झाल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या राज्यात निर्माण झालेली आहे.


२. राज्यात कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनाथ झालेल्या बालकांची कौटुंबिक व आर्थिक हानी झाली असून, त्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बालकांची भावनिक व वैयक्तिक हानी भरुन निघणे सर्वतः अशक्य आहे. तथापि, या बालकांचे शिक्षण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईपर्यंतचे आयुष्य त्यांना सन्मानाने जगता यावे व याकामी आर्थिकदृष्टया पूरक ठरावी या हेतूने राज्य शासनाकडून नजीकच्या कालावधीसाठी तसेच भविष्यासाठी देखील आवश्यक सहाय्य उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. शासनाच्या या योगदानामुळे सदर बालकांचा आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होऊन त्याचा • अप्रत्यक्षरित्या देशाच्या विकासास हातभार लागून त्यास चांगले नागरिक म्हणून उभे राहण्याची संधी उपलब्ध होऊन सदर बालके त्यांच्या भविष्याविषयी आश्वस्त होतील.


३. मा. सर्वोच्च न्यायालयांतर्गत गठीत बाल न्याय समितीच्या दिनांक ५.५.२०२१ रोजीच्या बैठकीमध्ये, एकाच कुटुंबातील दोन्ही पालकांचा (आई आणि वडील) मृत्यु झाल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन करणेसाठी उपाययोजना करणेसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठीत करणेबाबत निदेश प्राप्त झाले होते. मा. सर्वोच्च न्यायालयाकडून प्राप्त निदेशाच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक ७.५.२०२१ अन्वये जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय टास्क फोर्स (कृती दल) गठीत करण्यात आलेला आहे. सदर टास्क फोर्स मुख्यत: जिल्ह्यात कोवीड- १९ मुळे अनाथ झालेल्या बालकांबाबतची माहिती संकलीत करणे, बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करून देणे व अशी बालके बाल कामगार, अनैतिक मानवी वाहतूक, मानवी तस्करी यास बळी पडणार नाहीत याची काळजी घेणे, बालकांचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेणे आवश्यकतेनुसार बाल संगोपन योजनेचा लाभ मिळवून देणे किंवा बालगृहात दाखल करणे इत्यादी विविध जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत.


४. कोवीड-१९ मुळे अनाथ झालेल्या बालकांच्या संगोपनासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कौटुंबिक वातावरणात राहिलेल्या व कोवीड मुळे अनाथ झालेल्या बालकांना सरसकट बालगृहांमध्ये दाखल


शासन निर्णय क्रमांक अनाथ-२०२१/प्र.क्र.४०३


करण्याऐवजी अशा अनाथ बालकांना कौटुंबिक वातावरण उपलब्ध व्हावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.


५ उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता, ज्या बालकांनी आपले पालक गमावलेले आहेत, अशा बालकांना फायदा होऊन त्यांचे शिक्षण तसेच अर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. सबब, महाराष्ट्र राज्यामध्ये सुध्दा कोरोना (कोविड १९) संसर्गामुळे अनाथ झालेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय


केंद्र शासनाच्या "PM CARES For Children Empowerment of COVID Affected Children" ह्या योजनेव्यतिरिक्त राज्य शासनाकडून कोरोना (कोविड १९) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.


२. सदर योजनेंतर्गत कोविड १९ संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य उपलब्ध करणेबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही निश्चित करण्यात येत आहे. :


१) योजनेचा उद्देश :


महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना (कोविड-१९) संसर्ग किंवा इतर कारणामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेल्या ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांचे पुनर्वसन करणे व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहाय्य करणे.


२) योजनेचे लाभार्थी :


१. दिनांक ०१ मार्च, २०२० रोजी किंवा त्यानंतर कोरोना (कोविड १९) संसर्गामुळे ज्या बालकाचे दोन्ही पालक (आई आणि वडील) मृत्यू पावलेले आहेत अशी ० ते १८ वयोगटातील बालके.


२. दिनांक १ मार्च २०२० रोजी किंवा त्यानंतर एका पालकाचा आई किंवा वडील) कोवीड १९ मुळे तर


एका पालकांचा इतर कारणामुळे मृत्यु झाला असल्यास त्यांची ० ते १८ वर्षाआतील बालके. ३. दिनांक १ मार्च,२०२० पुर्वीच एका पालकाचा(आई किंवा वडील) मृत्यु झाला असेल व दिनांक १ मार्च, २०२० किंवा त्यानंतर एका पालकाचा कोवीडमुळे मृत्यु झाला असल्यास त्यांची ० ते १८ वर्षाआतील बालके. आहेत याचा पुरेपुर लाभ घेता येनार,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या