स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी समाजाचे आरक्षण मिळणे बाबत: महात्मा फुले समता परिषदेची मागणी
औसा मुख्तार मणियार
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे आरक्षण मिळावे यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा औसा औशाच्या वतीने आज दिनांक 30 जुन 2021 बुधवार रोजी औसा तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे. यामध्ये आमचे नेते आपले सहकारी माननीय नामदार छगनरावजी भुजबळ आपल्या मंत्रिमंडळातील विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत. ते आम्हा महाराष्ट्रातील सर्व ओबीसी चे नेते आहेत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ते संस्थापकीय अध्यक्ष ही आहेत. सध्या ओबीसी समाजातील आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोण अन्याय केला? याच्याशी आम्हाला तुम्ही असताना अडचण नाही.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा औसा येथील आम्ही सर्व पदाधिकारी व ओबीसी समाजाचे सैनिक माननीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या प्रत्येक ओबीसी आरक्षण बचाव मोहिमेत खंबीरपणे समता, स्वातंत्र्य, बंधुता लोकशाहीच्या मार्गाने संघर्षासाठी सत्याग्रहाची भूमिका असून आंदोलनाची भूमिका असून किंवा ओबीसीच्या न्याय हक्कासाठी च्या निर्णय प्रक्रियेत पावलो पावली साहेबांच्या सोबत आहोत. त्यांच्या आदेशाचे पालन करून आम्ही ओबीसी समाजाची वाटचाल करीत आहोत. आमचा मार्ग सनदशीर व कायदेशीर असून आम्ही सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या तोंडीस तोंड आम्ही खालील स्वाक्षऱ्या करणारे सैनिक रणांगणात सदैव डोळ्यात तेल घालून अन्यायाविरुद्ध लढण्यासाऊ कंबर कसून सज्ज आहोत. आम्ही अन्याय खपवून घेणार नाही!. सहनही करणार नाही..! कोणतीही भावनिक बाजू न मानता माननीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या आम्हाओबीसी प्रती असणाऱ्या सर्व मागण्या यापूर्वीही निवेदनाद्वारे आपणास सादर केले आहेत. त्यासही पाठिंबा आहे व ओबीसीच्या प्रत्येक मागण्याचे ही आम्ही समर्थन करतो. या सर्व मागण्या आमच्या न्याय हक्काच्या असून आपण सर्वांनी आपल्या सरकारच्या काळात विचार करुण आमच्या आयुष्याचा, आमच्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावेत . तरी कृपया आपण आमच्या मागण्यांचा आमच्यावर अन्यायाचा ओबीसी च्या भविष्याचा विचार करून विषयात उल्लेख केल्याप्रमाणे निर्णय घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शाखा औसा च्या वतीने औसा तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष सुधाकर माळी, उपाध्यक्ष नारायण माळी, माजी तालुकाध्यक्ष एन जी माळी, किशन बंशीलाल कोलते, व्यंकट कलमे, रविकांत खुरपे, राम कांबळे, चनबसप्पा केवळराम, हरिभाऊ फुलारी, श्रीमती बनकर यु के, दत्तात्रय महामुनी, चंद्रशेखर पोतदार, रविकांत खुरपे, नितीन म्हेत्रे, केशव भोजने, मोहन माळी, कुंडलिक क्षिरसागर, सुधाकर खडके, शाम गोरे, गणेश तेलंग, उमाताई मेत्रे, सुमन लोखंडे यादव बालाजी, बायस अनिरुद्र मदन सिंह, सोनवळकर प्रवीण, कठारे धनंजय यांच्या स्वाक्ष-या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.