सीए दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
लातूर/प्रतिनिधी: द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया लातूर शाखेच्या वतीने १ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या सीए दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लातूर शाखेचे अध्यक्ष सीए विशाल चव्हाण यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ७.५० वाजता दयाराम रोड येथील लातूर शाखेच्या कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार आहे.सकाळी ११ वाजता भालचंद्र ब्लड बँक,गांधी मार्केट येथे सीए व त्यांच्या परिवारातील सदस्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणाच्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महापौर विक्रांत गोजमगुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी १ ते ३ या वेळेत सीए व्यवसायाची कोविड पश्चात भविष्यातील परिस्थिती आणि सदस्यांच्या भूमिकेबद्दल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आयसीएआयचे माजी अध्यक्ष सीए उत्तमप्रकाश अग्रवाल हे संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमास व लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी शहरातील सर्व सीएंनी उपस्थित राहावे असे आवाहन लातूर शाखेचे अध्यक्ष सीए विशाल चव्हाण, उपाध्यक्ष सीए द्वारकादास भुतडा,सचिव सीए विनोद साळुंके,विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल व सदस्य सीए किशोर भराडिया यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.