पनाळे ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी च्या सोयाबीन ब्रीडर बियाण्याच्या पेरणीचा शुभारंभ.*

 *पनाळे ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी च्या सोयाबीन ब्रीडर बियाण्याच्या पेरणीचा शुभारंभ.*   











लातुर : दि. ३० - लातूर तालुक्यातील मंदार हरंगुळ (बु.) येथे पनाळे ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी च्या ब्रीडर व फाउंडेशन सोयाबीन  बियाण्याच्या पेरणीचा शुभारंभ दि. ३० जून रोजी लातूर जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्या हस्ते सोयाबीन बियाण्याचे व बी बी एफ पेरणी यंत्राचे पूजन करून करण्यात आला.  

ब्रीडर सोयाबीन वाण ६१२, व फाउंडेशन सोयाबीन वाण १५८  या बियाण्याची बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी करण्यात आली. 

पेरणीच्या या शुभारंभासाठी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना बी बी एफ तंत्रज्ञानाने केलेल्या पेरणीचे काय व कसे फायदे आहेत. आणि ते शेतकऱ्यांच्या कसे हिताचे आहे यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले.   

पनाळे ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी च्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांचा सत्कार कंपनीचे चेअरमन व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी समर्थ क्षीरसागर यांचा सत्कार विष्णुदास पाटे यांच्या हस्ते तर बावगे यांचा सत्कार निवृत्तीराव तिगीले यांच्या हस्ते करण्यात आला.  कृषी पर्यवेक्षक सुर्यकांत लोखंडे आणी कृषी सहाय्यक श्रीमती रेश्मा शेख यांचा सत्कार जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्या हस्ते करून त्यांना सन्मानित करण्यात आले.  पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम रेड्डी यांचा सत्कार सुशील पनाळे यांच्या हस्ते करण्यात आला. 

बीबीएफ तंत्रज्ञानाने होणाऱ्या या पेरणीच्या कार्यक्रमास यस. कुमार ॲग्रो चे शिवकुमार बिरादार, रामचंद्र तिगीले, ओंमप्रकाश गोपे, गहिनीनाथ बरुरे, दयाराम सुडे, विनोद जटाळ, संजय सुडे, सचिन इगे, हरी हेलाले, गणेश सगर, सुशील तिगीले, कृष्णा पनाळे, अतिश कुटवाड, धीरज चामे, आकाश पनाळे, बालाजी वाघमारे, अलीम सय्यद, सुधाकर चामे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित सर्व अधिकारी पाहुणे, शेतकरी बांधवांचे आभार कंपनीचे कार्यकारी संचालक संतोष पनाळे यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या