लातूर जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या कामांची आढावा बैठक ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत ची उपस्थिति

 

लातूर जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या कामांची आढावा बैठक

 

लातूर शहरातील भूमिगत वीजवाहिन्यांची कामे पाच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन

ऊर्जामंत्री डॉनितीन राऊत






 

मुंबईदि. 30 :

 लातूर शहरातील भूमिगत वीजवाहिन्यांची कामे पाच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करावेअशा स्पष्ट सूचना ऊर्जामंत्री डॉनितीन राऊत यांनी दिल्यालातूर जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या कामांची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी या सूचना दिल्या.

मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेमहावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरीएमएसईबी सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टेमहावितरणचे संचालक (संचालनसंजय ताकसांडेसंचालक (प्रकल्पभालचंद्र खंडाईतसंचालक (वाणिज्यसतीश चव्हाण मंत्रालयातून तर महापारेषणचे संचालक (प्रकल्पव्हीथंगपंडियनऔरंगाबाद विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक भुजंग खंदारेलातूरचे मुख्य अभियंताअधीक्षक अभियंताकार्यकारी अभियंता आदी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी मंत्री डॉराऊत आणि श्रीदेशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील रेणापूरअती उच्च दाब (ईएचव्हीउपकेंद्रनवीन विद्युत उपकेंद्र (सबस्टेशनउभारणीनवीन रोहित्रांची कामे तसेच नादुरुस्त रोहित्रांच्या बदल्यात द्यायची रोहित्रेऔसारेणापूर सौरऊर्जा प्रकल्प उभारणीलातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्पास मान्यता देणे आदी बाबींच्या अनुषंगाने या बैठकीत आढावा घेतला.

लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत सध्या काही भागातच भूमिगत वीजवाहिन्यांची कामे झाली असून महानगरपालिकेच्या संपूर्ण हद्दीत ही कामे पूर्ण व्हावीत अशी मागणी मंत्री देशमुख यांनी डॉराऊत यांच्याकडे केलीत्याअनुषंगाने तात्काळ व्यवहार्यता तपासून आणि केंद्र शासनाच्या प्रस्तावित योजनांमध्ये समावेश ही कामे येत्या पाच वर्षात टप्प्याटप्प्यांतर्गत पूर्ण होतील असे नियोजन करावेअसे निर्देश ऊर्जामंत्री डॉराऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 

 जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हाती घ्यायची कामे पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींनी सूचवल्याप्रमाणे प्राधान्यक्रमाने हाती घ्यावीतयाबाबत तक्रारी होणार नाहीत याची दक्षता घ्यावीनागरिकांच्या वीजपुरवठारोहित्रे आदींबाबतच्या तक्रारी अधिकाऱ्यांनी तातडीने सोडवाव्यातलातूर जिल्ह्यात विद्युत रोहित्रे नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसत असून त्याची कारणे शोधून तात्काळ उपाययोजना कराव्यातआदी निर्देश डॉराऊत यांनी दिले.

 

          महानिर्मितीकडून शिंदाळा-लोहारा (ताऔसायेथे उभारण्यात येणाऱ्या 60 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचाही आढावा यावेळी घेण्यात आलाया प्रकल्पासाठी साठी 174 हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात आली असून प्रकल्पासाठी माती तपासणीप्रकल्प आरेखन आदी तयार केले असून लवकरच प्रकल्पाचे सादरीकरण ऊर्जामंत्री डॉराऊत आणि पालकमंत्री श्रीदेशमुख यांच्यासमोर करण्यात येईलत्यानुसार प्रकल्प उभारणीला तात्काळ सुरूवात करण्यात येईलअशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिलीलातूर महानगरपालिकेच्या वीजेच्या थकबाकीच्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा झाली.

                         ००००

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या