अल्ताफ शेख उस्मानाबाद/ प्रतिनिधी
*कोणती लस सर्वात प्रभावी आहे ? -*
तसे तुम्हाला माहिती असेल - एखाद्या लशीची इफिकसी व्हॅल्यू म्हणजे ती लस किती प्रभावी आहे हे काढण्यासाठी उत्पादक कंपनी निवडक व्यक्तींवर चाचण्या घेते त्यात दोन गट पाडले जातात
एका गटाला लस दिली जाते , तर दुसऱ्या गटाला प्लासिबो दिली जाते या दोन गटांतल्या किती व्यक्तींना कोविड-19चा संसर्ग झाला, याचा आढावा ठरावीक कालावधीनंतर घेतला जातो
*पहा कोणती लस किती प्रभावी ?*
*फायझर-बायोएनटेक* - 11 डिसेंबर 2020 रोजी अमेरिकेच्या FDA कडून या कंपन्यांच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली - अशी मंजुरी मिळालेली ही जगातली पहिली लस ठरली आहे
या लशीचे दोन्ही डोस घेतले असल्यास भारतात पहिल्यांदा आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटपासून संसर्ग होण्याची शक्यता 88 टक्क्यांनी, तर हॉस्पिटलायझेशन ची शक्यता 86 टक्क्यांनी घटत असल्याचे पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेच्या अभ्यासात आढळले
*मॉडर्ना* - ही लसही कोरोनाचा आजार रोखण्यात 94.1 टक्के प्रभावी ठरत आहे तसेच - 65 वर्षं आणि त्यावरच्या वयोगटातल्या व्यक्तींमध्ये मॉडर्नाची लस केवळ 86 टक्के प्रभावी आहे - मॉडर्नाची लस कोरोना विषाणूच्या अल्फा आणि बीटा व्हेरिएंट्सपासून संरक्षण देते
*नोव्हाव्हॅक्स* - हि लस 65 वर्षांवरच्या अन्य आजार असलेल्या आणि सातत्याने संसर्गग्रस्तांशी संपर्कात असलेल्या गटातल्या नागरिकांमध्ये ही लस 91 टक्के प्रभावी असल्याचं कंपनीचे म्हणणे आहे
*कोविशिल्ड* - तसे तुम्हाला माहिती असेल या लसीचे उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात केले आहे - ही लस कोविडविरोधात 76 टक्के प्रभावी आहे - या लसीच्या दोन डोसमधले अंतर 12 आठवडे किंवा त्याहून जास्त केले , तर ही लस 82 टक्के प्रभावी ठरत आहे
*स्पुतनिक व्ही* - ही लस मॉस्कोच्या गॅमालिया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिऑलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या संस्थेने विकसित केली आहे - ही लस 91.6 टक्के प्रभावी असल्याचे तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांमध्ये आढळले आहे
*कोव्हॅक्सिन* - ही लस हैदराबादच्या भारत बायोटेक या कंपनीने विकसित केली आहे - तसेच कोविडविरोधात 77.8 टक्के प्रभावी आहे
डेल्टा व्हॅरिएंटविरोधात 65.2 टक्के प्रभावी आहे त्याचबरोबर गंभीर लक्षणयुक्त कोविडविरोधात 93.4 टक्के प्रभावी आहे.
*दरम्यान लसी विषयी असलेले* - हे नॉलेज अपडेट प्रत्येक नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.