ना. अमित विलासराव देशमुख यांनी उपजिल्हा रुग्णालय निलंगा
येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची केली पाहणी
लातूर प्रतिनिधी (शुक्रवार दि. १३ ऑगस्ट २१)
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आज शुक्रवार दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारी उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथील ऑक्सिजन निर्मिती युनिटची पाहणी केली. हा प्रकल्प लवकरात लवकर उभारावा, अशा संबंधितांना सूचना केल्या. यावेळी रुग्णालयातील उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, उपजिल्हा रुग्णालय निलंगाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप सोंदळे, डॉ. प्रल्हाद सोळंके, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे,सचिन दाताळ, लिंबन महाराज रेशमे, प्रवीण सूर्यवंशी आदीसह रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.