*माणुसकीचे दर्शन..*
*ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्यासह तुळजापूरला जात होते.अपघातात गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत एक व्यक्ती आढळून आली.*
अल्ताफ शेख प्रतिनिधी/ उस्मानाबाद उच्च शिक्षण मंत्री मा. ना. उदयजी सामंत साहेब आपला उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा आटोपून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्यासह तुळजापूरला जात होते.
यावेळी बावी पाटीला अपघात झालेला त्यांना दिसला. लागलीच मंत्री महोदय, खासदार, आमदार यांनी आपल्या गाड्या थांबवून अपघाताची पहाणी केली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत एक व्यक्ती आढळून आली. लागलीच त्यांनी त्या व्यक्तीला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या गाडीतुन जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास पाठविले व जिल्हा शल्य चिकित्सक यांना सदरील अपघाताची कल्पना देऊन जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या. व त्या व्यक्तीच्या उपचाराचे अपडेट कळविण्यास सांगितले.
यानंतर मा. मंत्री महोदय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व कैलास घाडगे पाटील यांच्यासह तुळजापूर कडे रवाना झाले.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.