*राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.श्री.उदयजी सामंत साहेब जिल्हा दौऱ्यावर आले असता उस्मानाबाद जिल्ह्यात आवश्यक शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावे*
अल्ताफ शेख प्रतिनिधी/उस्मानाबाद आज दि.१३ ऑगस्ट रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.श्री.उदयजी सामंत साहेब जिल्हा दौऱ्यावर आले असता उस्मानाबाद जिल्ह्यात आवश्यक शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने १) उस्मानाबाद येथे १६ ऑगस्ट २००४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठचे उपकेंद्र सुरु करण्यात आले आहे. उस्मानाबाद येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेता सध्या अस्तित्वात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर स्वतंत्र विद्यापीठ म्हणुन कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
२) उस्मानाबाद येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यासाठी उस्मानाबाद नगरपालिका जागा देण्यास तयार असून सदर जागेत अभ्यासिकेसाठी सुसज्ज इमारत उभारण्यात यावी.
३) शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, उस्मानाबाद येथील जुन्या इमारतीची सुधारणा करुन मराठा मुलींसाठी वस्तीगृह उभारण्यात यावे. अशा विविध शैक्षणिक विकासाच्या बाबतीत महत्वाचे विषय मार्गी लावणे बाबत मंत्री महोदयांना कडे निवेदन द्व्यारे विनंती मागणी केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, संजय देशमुख, जि.प.सदस्य उद्धव साळवी, जिल्हाप्रमुख गौतम लटके सर, दिलीप जावळे, मधुकर बोंदर, आदी पदाधिकारी उपस्थित होते



0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.