*कृषीमंत्र्यांची शेतकऱ्यांच्या गंभीर विषयावर प्रतिक्रिया नाही*
दि. 31 - उस्मानाबाद -
अन्नदाता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते गांभिर्य दाखवतील व अनेक महिन्यांपासून प्रलंबित बैठक निदान व्हर्च्यूअली उपस्थित राहून तरी संवेदनशीलता दाखवतील असे वाटत होते. परंतु, ते सहभागी न झाल्याने शिवसेनेचे शेतकऱ्या विषयी अनास्था पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचे आ. पाटील यांनी म्हटले आहे. खरीप २०२० मधील पीक विम्यापोटी कंपनीला ५०० कोटींहून अधिकचा नफा होत आहे. त्यामुळे वारंवार मागणी करून देखील कृषी मंत्री बैठक का बोलावत नाहीत, हे आता जनतेला समजून आले आहे. या विषयावर न्यायालयीन लढा तर सुरू आहेच. मात्र, शेतकऱ्यांना लवकर न्याय मिळावा यासाठी शासन स्तरावर बैठकीची मागणी केली होती, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सोमवारच्या बैठकीत पावसातील खंडामुळे झालेले नुकसान मान्य करत जिल्हाधिकाऱ्यांनी अपेक्षेप्रमाणे २५ टक्के अग्रीम रक्कम देणेबाबत अधिसूचना काढण्याचे आदेश दिले. आपण सुरू केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे नक्कीच दिलासा मिळेल, अशी आशा आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170
Mail :Laturreporter2012g@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.