*आमदार राणाजगजीतसिंह पाटील करणार शंखनाद*
दि. 31 - उस्मानाबाद -
देव धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या , देवी देवतांना बंदिस्त करून लाखो गरिबांची उपासमार करणाऱ्या अधर्मी आणि जुलमी ठाकरे सरकारला मंदिर उघडण्याचा इशारा देण्यासाठी हे शंखनाद आंदोलन असल्याचे भाजपने जाहीर केले आहे.राज्यातील विविध मंदिरासमोर हे आंदोलन होणार आहे.कसबा गणपती पुणे येथे चंद्रकांत पाटील,रामकुंड नाशिक येथे आचार्य तुषार भोसले व आमदार देवयानी फरांदे,कल्यानेश्वर मंदिर नागपूर येथे चंद्रशेखर बावनकुळे,गजानन महाराज मंदिर औरंगाबाद आमदार अतुल सावे,शेगाव येथे डॉ संजय कुटे, कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर येथे महेश जाधव,पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आमदार प्रशांत परिचारक व समाधान आवताडे आणि शिर्डी साई बाबा मंदिर येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ सुजय विखे आंदोलन करणार आहेत.
राज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक समनव्य आघाडीच्या वतीने राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येणार आहे. मंदिर हम खुलवायेगे , धर्म को न्याय दिलायेगे असा नारा देत सोमवारी 30 ऑगस्ट रोजी राज्यभर प्रमुख मंदिरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिर समोर सकाळी 11 वाजता आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.मंदिर बंद,गरीबांचे हाल ठाकरे सरकार मालामाल व मंदिर बंद, उघडले बार उद्धवा धुंद तुझे सरकार असा आरोप आमदार राणा यांनी केला आहे.
*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170
Mail :Laturreporter2012g@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.