भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून देशाची लोकशाही बळकट करण्यात सर्वात मोठा वाटा अनुसूचित जाती वर्गाचा ...
मा,आ,सुधाकर भालेराव
अ जा मोर्चा प्रदेशाध्यक्ष
आज दि 30 अगस्ट 2021 रोजी भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या सर्व जिल्हाअध्यक्ष तालुकाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष सह राज्यातील सर्व प्रमुख पादधिकारी यांची वर्चुल बैठक झाली या बैठकीत अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेश अध्यक्ष मा आ सुधाकर भालेराव यांचा संपूर्ण महाराष्ट्र भर दौरा 21 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर होणार असून या दौऱ्या च्या पूर्व नियोजित तयारी साठी ही बैठक घेण्यात आली या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना सुधाकर भालेराव म्हणाले, हा विभागीय दौरा सर्व पदाधिकारी एकत्र येऊन भारतीय जनता पक्ष वाढिसाठी पक्ष बळकट करण्यासाठी,भारतीय जनता पक्षाचे विचार घरोघरी पोहचवणे, व येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका, महानगरपालिका या सर्व निवडनुकीत भाजपाचे उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून कसे आणता येईल , येणारी लढाई ही कार्यकर्त्याची लढाई आहे,त्या साठी कार्यकर्त्यांनी एक मूठ बांधून जोमाने कामाला लागले पाहिजे, आव्हान मोठं आहे ,तिन पक्षाच्या विरोधात आपली लढाई असणार आहे,
होणाऱ्या निवडनुकीत जास्तीत जास्त मतदान केंद्रावर मतदान करून घेण्याची पूर्व तयारी करण्यासाठी हा दौरा असेल,
ह्या देशात जे ही निवडणूक होतात जर पाच वर्षाला त्या निवडनुक मध्ये,होणाऱ्या 65 टक्के ते 75 टक्के मतदाना पैकी 30 ते 35 टक्के मतदान सर्वात जास्त मतदान करणारा वर्ग हा अनुसूचित जातीचा असतो,
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराचा सर्वात जास्त हक्क बजावणारा वर्ग हा अनुसूचित जाती चा आहे,राज्यापासून ते दिल्लीच्या राजकारणा पर्यंत सरकार देण्यात सर्वात मोठं योगदान हे अनुसूचित जाती वर्गाचे आहे,70 ते 80 वर्षांचे आजी आजोबांना पाठीवर घेऊन मतदान करून घेणारा हा अनुसूचित जाती वर्ग आहे,
हा वर्ग मोल मजुरी कष्ट
करून खाणारा वर्ग आहे ,
तरी सुद्धा मतदाना रोजी आपला हक्क बजावून राज्य असो की देश असो,,,, देशाची मजबूत लोकशाही चालवण्यासाठी सर्वात मोठं मतदानाच योगदान देतो..…
तरी ही हा माझा वर्ग माझे बांधव विकासापासून,वंचीत आहेत, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले पाहिजे तसा विकास झाला नाही, ..... गेल्या 7 वर्षांपासून...
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता अनुसूचित जाती वर्गाला मोठ्या प्रमाणात सुविधा देण्याचं कार्य करत आहेत ,पंतप्रधान यांचं स्वप्न होत गोरगरीबांना स्वताचे घरे झाली पाहिजेत आज देशात सर्वात जास्त प्रमाणात पंतप्रधान आवास योजना सुरू आहे, प्रत्येक गरिबांचे बँकेचे जनधन च्या माध्यमातून खाते आहेत,आता थेट पैसे त्या खात्यावर टाकण्याचे कार्य मोदी सरकार करत आहे,अनुसूचित जाती वर्गातील विध्यार्थ्याच्या शैक्षणिक विषयात केंद्र सरकार चांगलं काम करत आहे,नुकत्याच झालेल्या केंद्राच्या मंत्रीमंडळात अनुसूचित जाती वर्गाला मोठया प्रमाणात हिस्सा देण्यात आला,भारतीय जनता पार्टीचा सर्वात मोठा मताचा हिस्सा हा अनुसूचित जाती चा आहे भारतीय जनता पार्टीचा केंद्र बिंदू म्हणून कार्य करणारा घटक आहे,भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी अनुसूचित जाती मोर्चा खम्बिर पणे उभा असतो
,कोरोना च्या वैश्विक महामारी मध्ये मोदी सरकार ने केलेले कार्य,गोरगरीब जनतेला मोफत धान्य वाटप,या सर्व विकास कामांना जनते पर्यंत घेऊन जायचे आहे,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विकास कार्य सुद्धा जनतेपर्यंत घेऊन जान्या साठी ,भारतीय जनता पार्टी चे संघटन मजबूत करण्यासाठी हा दौरा असणार आहे,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.