मॉर्निंग वॉक ग्रुप तर्फे बार्शी रोडवर वृक्षारोपण

 मॉर्निंग वॉक ग्रुप तर्फे बार्शी रोडवर वृक्षारोपण







दयानंद गेट ते एकमत ऑफिस या रस्त्यावर दररोज फिरणारया मॉर्नींग वॉक ग्रुप च्या सदस्यांनी आज बार्शी रोडवर ग्रीन लातूर वृक्ष टीम सोबत ५२ मोठी झाडे लावून वृक्षारोपणाच्या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवला. या सर्व सदस्यांनी ग्रीन लातूर वृक्ष टिमच्या सदस्यांच्या मदतीने श्रमदानातून खड्डे खोदून पिंपळ, निलगुलमोहर, पिंटोफॉर्म, करंज यांची मोठी झाडे लावून त्यांना काठ्या लावल्या. यावेळी मॉर्नींग वॉक ग्रुपचे प्राचार्य माधव गादेकर, श्रीमंत गवळी, बालाजी साबळे, डॉ. रमेश पारवे, रामकृष्ण कसबे, छगन गायकवाड, वामनराव कांबळे, डी. एम. जगताप, फेरे गुरुजी  यांनी परिश्रम घेतले. ऑगस्ट महिन्याच्या ३१ दिवसात ग्रीन लातूर वृक्ष टिमच्या माध्यमातून शहरात २६०० मोठी झाडे लावण्यात आली आहेत.
वृक्षलागवड व वृक्ष संगोपन कार्याचे अविरत ८२२ दिवस पुर्ण करत ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, पद्माकर बागल, मिनाक्षी बोंडगे, नगरसेवक इम्रान सय्यद, सुलेखा कारेपुरकर, राहुल माने, दिपक नावाडे, आशा अयाचित, विदुला राजमाने, सिध्देश माने, कपील काळे, अभिजित चिल्लरगे यांनी मॉर्नींग वॉक ग्रुप च्या सदस्यांना सहकार्य करत श्रमदान केले.
🌳ग्रीन लातूर वृक्ष टीम🌳

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या