औशात अशोक कालीन स्तंभ उभारणार - नगराध्यक्ष डॉ अफसर शेख..
औसा/ प्रतिनिधी : - औसा हे ऐतिहासिक शहर असून या शहरातील भुईकोट किल्ला, प्राचीन धार्मिक स्थळ सोबतच महापुरुषांच्या विचाराचा वारसा जपण्यासाठी नूतन वास्तू साकारल्या जात आहेत. समता नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अशोक कालीन स्तंभ व कमानी उभारून महापुरुषांचा वारसा जपण्यासाठी या परिसरातील युवकांनी अशोक कालीन स्तंभ बांधण्याची मागणी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांना केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत नगराध्यक्षांनी या परिसरात अशोक कालीन स्तंभ व कमान बांधण्यासाठी मंजुरी देण्यासाठी हमी दिल्याने नगराध्यक्षांच्या या निर्णयाचे नागरिकांनी कौतुक केले आहे. महापुरुषांच्या स्मरणार्थ अशोक कालीन स्तंभ उभारणीसाठी नगराध्यक्षांनी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल समता मित्र मंडळ व परिसरातील युवक तसेच उपनगराध्यक्षा सौ कीर्ती कांबळे, जय बुद्ध कांबळे, अॅड. एल सी कांबळे, प्रदीप कांबळे, प्रवीण साबळे, सुधाकर शिंदे, सुनील जाधव, समाधान लोखंडे,एन जी जाधव, पंकज होळीकर, उमेश जाधव, सुनित जोगदंड, राहुल टेकाळे, कैलास सोनकांबळे, निळकंठ कुटे, शैलेंद्र सरवदे, प्रभाकर सूर्यवंशी यांनी नगराध्यक्ष अफसर शेख यांचे अभिनंदन केले आहे. शिवकालीन मराठा भवनानंतर आता अशोक कालीन स्तंभ व कमान बांधण्यात येत असल्याने औसा शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.