फातिमाबी शेख " प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे पुणे येथे थाटात प्रकाशन

 " फातिमाबी शेख " प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे पुणे येथे थाटात प्रकाशन






ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या वतीने काल दि. २६ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद येथे  वेदांत प्रकाशन  प्रकाशित अनिसा सिकंदर शेख आणि दिलशाद सय्यद संपादित *फातिमाबी शेख* या ऐतिहासिक काव्यग्रंथाचे थाटात प्रकाशन करण्यात आले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस सर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. कार्यक्रमाचे उदघाटन अय्युब इलाही शेख (माजी नगरसेवक, पुणे  ) यांनी केले. ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेतर्फे अॅड .हाशम पटेल, इस्माईल शेख , बा. ह. मगदूम, शफी बोल्डेकर, हाजी नदाफ,  जाफरसाहाब  शेख , प्रा.डॉ.शेख म.रफी , डाॅ. शमशोद्दीन तांबोळी आणि म.सा.प चे कार्याध्यक्ष  दिपक करंदीकर ,इंतेखाब फराश , खाजाभाई बागवान , रशीद तहसीलदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. सय्यद जब्बार पटेल यांनी केले तर संपादकीय मनोगतातून अनिसा शेख यांनी धर्माची , जातीची चौकट झुगारून मुस्लिमांसह हिंदूंनीही फातिमाबीना न्याय द्यावा ही अपेक्षा व्यक्त केली .यावेळी लोकमतचे वृत्तनिवेदक मधुकर भावे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले.

"फातिमामाईचे ऋण केवळ केवळ मुस्लिम समाजासाठी नसून हिंदूंवरही आहे. सावित्री माईंच्या मोठोपणाला वंदन करत फातिमाबी यांच्या कार्याची नोंद इतिहासात का नाही ? अहिल्याबाई , सावित्रीबाईंच्या नावाने विद्यापीठ असेल तर फातिमाबीच्या नावाने विद्यापीठ का नाही ? कोणत्याही ग्रंथालयात फातिमाबी च्या समर्पणाचं एकही पुस्तकं का नाही ? याला हिंदूंसोबतचं मुस्लिम ही तेव्हढयाचं प्रमाणात जबाबदार आहेत अशी  खंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.   तसेचं फातिमाबी काव्य संग्रहाच्या दोन्ही संपादिका यांनी हा संग्रह प्रकाशित करून फातिमाबी यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला. अशा शब्दात त्यांचा गौरवही केला.

अय्युब इलाही यांनी डॉ. सबनीस सरांच्या सूचनेनुसार दर वर्षी फातिमाबी यांच्या नावाने एकदिवसीय  साहित्य संमेलन घेण्याचे आश्वासन दिले. आणि फातिमाबी या काव्यसंग्रहाच्या पन्नास  प्रति विकत घेऊन अभ्यासकांना देण्याचे कबुल केले.

 ज्येष्ठ संपादक मधुकर भावे ,सौ. शामला पंडीत, व  इतर मान्यवर यांच्या शुभेच्छा यावेळी मिळाल्या.

" वेदांत  " प्रकाशनाने सर्व जाती धर्म बंधन झुगारून उत्तमोत्तम,दर्जेदार साहित्य वाचकाना मिळावे या भूमिकेतून फातिमाबी यांच्या कार्याला उजागर करण्यासाठी या पुस्तकाचे प्रकाशन करणे आवश्यक होते. फातिमामाईचा  मला सार्थ अभिमान आहे . असे वक्तव्य वेदांत प्रकाशनाच्या प्रकाशिका सौ.सुप्रिया कुलकर्णी यांनी केले.

या प्रकाशना दरम्यान अनिसा सिकंदर शेख यांची दोन पुस्तकं ' सांगाती  व ' संवाद हृद्याशी ' व प्रा.रेखा संगारे यांचे ' तीन घडीचा डाव 'आणि दिलशाद सय्यद यांचे  'रंग उन्हाचे ' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशनानंतर कवी , गझलकार दिपक करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवीसंमेलन संपन्न झाले. कवीसंमेलनाचे सुत्रसंचालन प्रा. डाॅ. म. रफी यांनी केले. तर आभार संस्थापक शफी बोल्डेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हाध्यक्ष कवी ,गझलकार बा.ह. मगदूम , कवी आय. के शेख , दत्तु ठोकळे , डाॅ.शाकीर शेख,  शौकत मुलाणी , अॅड.सौ. जयश्री बोडेकर , सौ. ए. बी . काझी आदिंनी विशेष प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या