सोयाबीन काढण्यासाठी गेलेल्या मजुराचा ह्रदय विकारांच्या झटक्याने मृत्यू.
औसा प्रतिनिधी
दोन तीन दिवसापासून पाऊस सुरू होता आज पावसाने उघड दिल्यामुळे बेलकुंड येथील मजूर सतीश रामराव पवार (खोकले) वय 42 वर्ष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
आज बेलकुंड येथील दहा पंधरा मजूर मासूर्डी शिवारात सोयाबीन चे काड काढण्यासाठी गेले होते. आज दुपारी तीन च्या सुमारास सतीश पवार याना अचानक ह्रदय विकाराचा तीव्र झटका बसला. उपचारासाठी बेलकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेत असताना रस्त्यामध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बेलकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वविच्छेदन करून नातेवाईकांना प्रेत देण्यात आले त्यांच्या पार्थिवावर बेलकुंड येथिल स्मशानभूमीत रात्री उशीरा अंत्यविधी करण्यात आला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.