शिवलिंगेशवर महाविद्यालयात लसीकरणाचे उद्घाटन
युवा स्वास्थ्य मिशन अंतर्गत शिबीर
SHIVLINGESHWAR COLLEGE OF PHARMACY
औसा: तालुक्यातील आलमला येथील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी कॉलेज, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय आणि फार्मसी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मिशन युवा स्वास्थ्य मोहिमे अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी कोव्हिड १९ चे लसीकरण दि. २६ रोजी श्री विश्वेश्वर संकुलात करण्यात आले.
लसीकरण मोहीमेचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेख, उपसभापती विश्वास काळे, शिवसेना गटनेता विनोद माने, संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, प्राचार्य प्रशांत धराशिवे, प्राचार्य गोपाल दंडीमे व उप-प्राचार्य दिनेश गुजराथी यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करुन करण्यात आले.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे यांनी केले लसीकरण मोहीमेस प्रमिला शिंदे, डॉ. संतोष पाटील, लामतुरे, संस्थेतील प्रत्येक विभागाचे गट प्रमुख, प्राध्यापक वर्ग वा व शिक्षकेतर कर्मचारी, आशा कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. सौ. कविता शिरगिरे यांनी केले व आभार प्रदर्शन संस्थेचे उप सचिव महादेव खीचडे सरांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.