ज्यांना पिठाची चक्की चालवण्याची अक्कल नाही त्यांनी साखर कारखान्यांविषयी बोलू नये
- सौ विद्द्याताई पाटील
लातूर/प्रतिनिधी: सहकार चळवळ चालवणे हे सोपे काम न नाही.सहकारामुळेच आज जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्याला चांगले दिवस आलेले आहेत.पण काही मंडळी यात खोडा घालण्याचे काम करत आहेत.ज्यांना पिठाची गिरणी चालवता आली नाही त्यांनी साखर कारखान्यांविषयी बोलू नये,असे मत सौ विद्या ताई पाटिल यांनी व्यक्त केले.
जिल्ह्य़ातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सर्वांगीण परिवर्तन लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वात झाले आहे.भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह स्थानिक भाजपा नेत्यांचे नाव न घेता टोला लगावला.
जिल्हय़ाच्या निर्मिती पासून आपण महाराष्ट्र राज्यात अत्यंत गतिमान स्वरुपात जिल्हाचा चौकस विकास साधलेला आहे.मराठवाड्यात मागास म्हणुन लातूरची असलेली ओळख पुसून काढून अत्यंत प्रगतीशील लातूर नावारूपास आणण्याचे कार्य विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीने सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नियोजनात अमितभैय्या देशमुख यांनी महाराष्ट्राच्या नकाशावर लातूरचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.१९८२ साली जिल्हा निर्मिती झाली.त्यावेळी आपण सर्वच क्षेत्रात मागे होतो.त्यावेळी लातूरला पुढे नेण्याचे शिवधनुष्य विलासराव देशमुख यांनी उचलले.आता पाठीमागे न पाहता शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत लातूर पॅटर्न म्हणुन नावारूपास आणले.आज संपूर्ण राज्यातील विद्यार्थी लातूरला शिक्षणाची पंढरी म्हणुन पाहू लागलेला आहे.
लातूरला मोठी M.I.D.C.उभारून उद्योग विश्व निर्माण केले.यातून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. दुष्काळसदृष्य म्हणुन ओळख असणार्या लातूर परिसरात विविध ठिकाणी बंधारे,तलाव बांधुन शेती सिंचनाखाली आणली. त्यामुळे उद्योगधंद्यास भरभराटी येऊन शेतकर्यांसह मजुरांचे जीवनमान उंचावले.
शेतकर्यांची आर्थिक नाडी म्हणुन जिल्हा बँकेची ओळख असते.शेतकर्यांच्या जीवनात अर्थवाहिनी म्हणुन जिल्हा बँक काम करते.आज जिल्हाभरात १२२ शाखा आहेत.सोबतच अनेक सहकारी बँकांचे जाळे संपूर्ण जिल्हय़ात विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून पसरलेले आढळून येते.शेतकरी,शेतमजूर, गोरगरीब यांच्या विकासाचे धोरण सातत्याने देशमुख परिवाराने आखलेले आहे. याची जाणीव लोकांना आहे. म्हणुनच लोकांचा प्रचंड विश्वास आणि निष्ठा देशमुख परिवारावर आहे.मांजरा कारखान्याच्या रूपाने देशात नावाजलेला शेतकर्यांचा साखर कारखाना उभा करून नावलौकिक कमावलेला आहे.शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारीत अनेक साखर कारखाने उभारून शेतकर्यांसह,मजूर,ऊसतोड कामगार, कर्मचारी,छोटे मोठे व्यावसायिक यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्याचे महान कार्य देशमुख परिवाराने केलेले आहे.
आज ट्वेंटीवन साखर कारखाना अवघ्या काहीच दिवसामध्ये अमितभैय्या देशमुख यांनी उभा केलेला असून ४० किमी अंतरातील शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन पक्ष,जात, धर्म न पाहता शेअर्स देऊन सभासद करून घेतले.विरोधकांचाही सन्मान करण्याची परंपरा लोकनेते विलासराव देशमुख यांनी घालून दिलेली आहे.तीच परंपरा पुढे देशमुख परिवार पाळत असल्याचे चित्र उभा महाराष्ट्र बघतोय.
आज भाजप नेते किरीट सोमय्या हे लातूर जिल्हय़ाच्या दौर्यावर येऊन भलतीच वल्गना करून गेले.इथली जनता अत्यंत हुशार आहे.खरं काय आणि खोट काय याचे परीक्षण करणारी जनता थापाड्या आणि सोंगाड्याला मुळीच भीक घालणार नाही.मागील ५ वर्ष भाजपा सरकार असताना लातुरातील बंद पडलेला एकही कारखाना चालू करू शकले नाहीत.उगीच असून अडचण आणि नसून खोळंबा आशी यांची स्थिती आहे. त्यामुळे देशमुख परिवाराने उभ्या केलेल्या विकासाच्या उपक्रमावर बोलण्याचा नैतिक अधिकार यांना आजिबात नाही.बिनबुडाचा आरोप करण्याची सुपारी घेणार्या सोमय्याला इथली जनता तोंडघुशी पाडल्या शिवाय राहणार नाही,असे मत सौ विद्या ताई पाटिल यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.