हासेगाव फार्मसीत १००% कोविड १९ लसीकरण .
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संचलित श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र हासेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत मिशन युवा स्वास्थ कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले .
या प्रसंगी श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे ,संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे हासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर डॉ बेलापट्टे जी.पी. , सारोळा चे सी. एच . ओ . डॉ गिरी बी.एस. , हासेगाव पी. एच. सी. चे श्री घोडके पी बी . लातूर कॉलेज ऑफ फार्मसी च्या प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे ,एन एस एस विभाग प्रमुख प्रा. बनसोडे गणेश प्रा. देशमुख एस ,प्रा. जोशी डी ए . , हासेगाव पी. एच. सी. चे पुंड एम.डी त्याच बरोबर श्रीमती गायकवाड ए.व्ही. , श्री मदने बी.एस. इत्यादी कर्मचारी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण शिबिरा दरम्यान उपस्थित होते. सदरील शिबीरा मध्ये राष्ट्रीय सेवा योजना चे बोबडे ऋतुजा ,लक्ष्मण कांबळे ,वावगे साक्षी आणि शुभम पांचाळ असे अनेक विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान मिळाले .
या लसीकरण शिबिरात श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेतील लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी हासेगाव,लातूर कॉलेज ऑफ बी फार्मसी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ एम फार्मसी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर,लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव , लातूर कॉलेज ऑफ सायन्स ,लातूर, लातूर कॉलेज ऑफ आय.टी, आय हासेगाव ज्ञानसागर विद्यालय हासेगाव ,गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल स्कूल , हासेगाव या सर्व युनिट मधील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि विध्यार्थी यांनी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण घेऊन कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला आळा घालण्याचे कार्य या ठिकाणी केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.