जिल्हा बँकेत दोन वाजे पर्यत९०.९४% मतदान
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नऊ जागेसाठी दुपारी दोन वाजे पर्यत ९०.९४% मतदान झाले अाहे.लातूर केंद्रात २१६, औसा ११४, निलंगा १२८, उदगीर १०३, देवणी ४५, जळकोट ४१, शिरूर अनंतपाळ ४०, अहमदपूर ९४, चाकूर ५७ व रेणापूर केंद्रात दुपारी दोन वाजेपर्यत ६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अाहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नऊ जागेसाठी मतदान होत अाहे.जिल्हाभरात दहा मतदान केंद्र आहेत.लातूर येथील मतदान केंद्रात सर्वाधिक २६० मतदार तर औसा११७,निलंगा१३७,उदगीर१०६,देवणी४७,जळकोट४७,शिरूर अनंतपाळ४३,अहमदपूर९९,चाकूर६४, व रेणापूर केंद्रात७३ असे एकूण ९९३ मतदारअाहेत. उद्या सोमवार रोजी मतमोजणी अाहे.एकूण १९ जागा असलेल्या या बँकेत १० संचालक बिनविरोध निवडून अाले अाहेत.देवणी,शिरूर अनंतपाळ तालुक्यात सोसायटी गटातून तर पतसंंस्था ,महिला( २) गटासह अारक्षणाच्या इतर अशा एकूण नऊ जागेसाठी अाज मतदान होत अाहे.दुपार पर्यत तरी मतदान शांततेत चालु अाहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.