एल.एम.एम.ग्रुप संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी एस.एम.युसूफ़ यांची निवड
बीड (प्रतिनिधी) - जमाअ्त ए महेदवीया च्या लाईक माइंडेड महेदवीज़ (एल. एम.एम.) ग्रुप या संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटीचे सचिव तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ यांची निवड करण्यात आली.
महेदवीया समाजाचे प्रश्न शासन-प्रशासन दरबारी मांडण्याकरिता व ते सोडविण्याकरिता सय्यद अली दीलावर उर्फ फ़र्रूख़ भाई यांनी लाईक माइंडेड महेदवीज़ (एल.एम.एम.) ग्रुप या संघटनेची स्थापना केलेली आहे. या ग्रुपचे संघटन भारत देशासह जगभरातील अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. या ग्रुपच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न शासन-प्रशासन दरबारी मांडण्यात येऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये एल.एम.एम. ग्रुप संघटना कार्यरत आहे. आता बीड जिल्ह्यात सुद्धा एल.एम.एम. ग्रुप संघटना कार्यरत झाली असून संघटनेने प्रथमच बीड जिल्ह्यासाठी अध्यक्षपदी जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी बीड चे सचिव तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांची निवड केली आहे. त्यांना पीर ओ मुर्शीद हज़रत ख़िबला सय्यद रोशन मियाँ, हज़रत सय्यद अथन सलमान मियाँ मुर्शीद आणि हज़रत सय्यद नुसरत तन्वीर मियाँ मुर्शीद यांच्या हस्ते जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. एस.एम.युसूफ़ यांनी त्यांचे वडील एम.ए.रऊफ़ यांच्यासह नियुक्तीपत्र स्वीकारले. एल.एम.एम. ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सय्यद अली दीलावर उर्फ़ फ़र्रूख़ भाई आणि महाराष्ट्र राज्याचे प्रभारी सय्यद ज़ाफ़र सादेख़ यांनी इतर समाजासह महेदवीया समाज व एल.एम.एम. ग्रुप साठीही एस.एम.युसूफ़ यांच्या हातून चांगले कार्य घडावे. अशा शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी महेदवीया जमाअ्तचे ज्येष्ठ सदस्य मुहम्मद अब्दुल सत्तार, मुहम्मद इस्हाक़, मुहम्मद मुस्तफा हन्नूरे, मुहम्मद अय्युब, मुहम्मद उस्मान, शेख ज़ुबेर, मुहम्मद अब्दुल ख़दीर, लईख़ मुहम्मद, परवेज़ मुहम्मद, शेख अब्दुल हमीद, शेख जावेद, मुहम्मद आरेफ़, शेख वसीफ़, शेख नसीर, मुहम्मद इलयास हावरे, शेख ज़फ़र, शेख सईद, शेख वासेख़, शेख लईख़ यांच्यासह बीड शहरातील महेदवीया जमाअ्तचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.