औसा तालूका खरेदी विक्री संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन*

 *औसा तालूका खरेदी विक्री संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन*



 

     तालूक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत हमी भावाने मालाची खरेदी करून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्याचे कार्य औसा तालूका शेतकरी सह खरेदी विक्री संघा मार्फत होत आहे . तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत दिनदर्शिका वाटप करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम खरेदी विक्री संघ करीत असून औसा तालूका शेतकरी सह खरेदी विक्री संघाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन माजी मंत्री मा . दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले . याप्रसंगी मा . देशमुख साहेबांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले . यावेळी उपस्थित मांजरा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे , खरेदी - विक्री संघाचे सभापती व मा . शिवसेना जिल्हा प्रमुख  संतोषभाऊ सोमवंशी , उपसभापती  शेखर चव्हाण , बाजार समितीचे उपसभापती किशारे जाधव , संचालक मनोज सोमवंशी , गणेश माडजे , संताजी होळकर , मारूती मगर , राजीव कसबे , श्रीधर साळुंके , योगेश गोरे , केशोर भोसले , गणेश जाधव , सुरेश मुसळे , बालाजी देशमुख , नागेश कोळपे , गणेश क्षिरसागर आदि उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या