पीकविम्यासाठी शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांचे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन

 पीकविम्यासाठी शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा 


उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांचे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन





    रेणापूर/प्रतिनिधी:
प्रधानमंत्री बीमा फसल योजनेअंतर्गत २०२१ सालचा खरीप हंगामात सोयाबीनचा पीकविमा मिळण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाईची रक्कम मिळावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल,असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी दिला आहे.
   २०२१साली खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री बिमा फसल योजनेअंतर्गत कंपनीकडे पैसे भरलेले होते. नुकसान झाल्यानंतर कंपनीकडून त्याची भरपाई मिळणे आवश्यक होते.परंतु ती न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी वारंवार अर्ज व तक्रारीही केल्या.तरीदेखील हजारो शेतकरी विमाभरपाई मिळण्यापासून वंचित राहिले.
   शिवसेना उपजिल्हाप्रमुख दाने यांनी विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक संतोष भोसले यांची भेट घेऊन शेतकर्‍यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन सादर केले.शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम तात्काळ देण्यात यावी,अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.यावेळी चैतन्य होळकर, काळे,विकास पवार,भगवान शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
   शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.आगामी १५ दिवसात भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू,असे आश्वासन जिल्हा समन्वयक संतोष भोसले यांनी सचिन दाने यांना यावेळी बोलताना दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या