हिवाळी अधिवेशनात आरोप प्रात्यारोप ५% मुस्लिम आरक्षणाचे काय..?
मुंबई – आज पासून हिवाळी अधिवेशन होत आहे त्यात अनेक समस्या संकटे आहेत हे विषेश पण यापैकी ज्या मुस्लिम समाजाची ७५ वर्षांपासून मते घेऊन दिशाभूल केली त्या मुस्लिम समाजातील मतदार यांच्या साठी मुस्लिम आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे न्या रंगनाथ मिश्रा कमेटी चा अहवाल व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुस्लिम आरक्षण दिले होते पण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माहित होते पुन्हा सत्ता येणार नाही आणी भाजप शिवसेना सत्ताधारी झाले व मुस्लिम आरक्षण रेंगाळले पण हाच मुद्दा मुस्लिम विकास परिषद संघटनेच्या माध्यमातून प्रा.वहिदाभाभी यांनी सन २००१ साली हा मुद्दा समाजाच्या निदर्शनास आणून दिला पुन्हा विविध संघटनेने हा मुद्दा ज्वलंत ठेवला व एम आय एम पक्षाने हा मुद्दा हाती घेतला आहे पण शासन हे बघ्यांची भुमिका घेत आहे तेव्हा या शासनकर्ते यांना जाणीव करून देण्याची गरज आहे कि साखर कारखाने , सुतगिरणी , जिल्हा मध्यवर्ती बँका , शिक्षण संस्था , मेडिकल काँलेज , इंजिनिअरींग काँलेज , सह आय टि क्षेत्रात मुस्लिम मते घेऊन सत्ता उपभोगली पण सत्तेच्या जवळ मुस्लिम समुदायाला येवुच दिले नाही जे महाराष्ट्र राज्यात सत्तेत सहभागी झाले तेही परप्रांतीय नेते लादले गेले तर मुस्लिम नेतृत्व हे राजकीय पक्ष व राजकीय नेते यांनी समाजावर थोपटले मुस्लिम समाज भावनिक वर अवलंबून असल्याने हे प्रकार होताहेत हि दिशाभूल नव्हे का ?
असो सध्या ओबीसी आरक्षण राजकीय स्थगिती , ओबीसी राज्य शासनाचा इंपिरियल डेटा सादर करणे , टिईटी परिक्षा घोटाळा , आरोग्य भरती घोटाळा , राजेछत्रपती शिवाजी महाराज बेळगाव पुतळा विटंबना ,, पुणे महानगरपालिका भरती घोटाळा , एस टी कर्मचारी संप , कोरोना चे संकट अद्यापही संपलेले नाही तसेच नवा विषाणू ओमोक्राँन याचे हि हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटतील हे मुद्दे हि उपस्थित होतील पण मुस्लिम आरक्षण ५% न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अमंलबजावणी होणे महत्त्वाचे आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.