रिंगणी येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील मौजे गुळखेडा ग्रामपंचायत अंतर्गत रिंगणी येथे जनसुविधा योजनेअंतर्गत 5लाख व जिल्हा परिषद तर्फे 6लाख अश्या एकूण 11लाख रुपयांच्या 503मिटर लांबीच्या सिंमेट रस्त्यांचे भूमिपूजन माजी पंचायत समिती सभापती तथा विद्यमान औसा तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत गुळखेडाचे उपसरपंच अमीन पटेल, रिंगणी पोलीसपाटील विठ्ठल पाटील, राजेंद्र रोंगे, आत्माराम बोचरे, धनराज रोंगे, रामराजे रोंगे, गणपती रोंगे, फुलचंद गाडेकर , बापूसाहेब रोंगे,मोहन तळेकर, बाळासाहेब सिरसले, राजेंद्र भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.