*भारतीय प्रजासत्ताक दिन,प्रा.शा.बुधोडा.*
आज दि.२६ जानेवारी २०२२ रोजी जि.प.प्रा.शा.बुधोडा येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पण कोविड:१९ चे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता म. गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजारोहण गावच्या सरपंच सौ.अज्ञानबाई मगर आणि शाळेचे मु.अ. श्री. युवराज घंटे सरांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी *भारताची उद्देशिका अर्थात संविधानाचे* संगीतमय गायन करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर निवडक बालचमुने समुहगान सादर केले. तर,कु.रुद्राणी,साक्षी,गायत्री,श्रेया,प्राची,वैभव... यांची भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती भारत कांबळे मॅमनी तर उत्तम सुत्रसंचालन श्री.प्रभाकर हिप्परगे सरांनी केले.
सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी,(शाळेत नियोजित लसीकरण असल्याने)आरोग्य कर्मचारी ,शिक्षणप्रेमी नागरिक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.नरेश थोरमोठे,श्रीमती पवार,स्वामी,साबदे,गठ्ठडे यांनी सहकार्य केले.
शेवटी उपस्थितांचे आभार मानून श्रीमती कच्छवा मॅमनी कार्यक्रमाची सुंदर सांगता केली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.