समदर्गा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

 समदर्गा  येथे विविध विकास कामांचा शुभारंभ




                                     औसा प्रतिनिधी ....तालुक्यातील समदर्गा ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांचा शुभारंभ भारतीय प्रजासत्ताकदिनी करण्यात आला जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख आणि पंचायत समिती सदस्य अशोक जंगले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल ठोक हे होते यावेळी सम दर्गा येथील गावातील स्ट्रीट लाईट वर एलईडी बल्ब बसविणे जिल्हा परिषद शाळा वर्ग खोली बांधकाम बंदिस्त नाली करणे तसेच जिल्हा परिषद शाळेत आरो प्लांट दलित वस्ती मजे पेव्हर ब्लॉक आणि धनगर वस्ती मध्ये सिमेंट रोडच्या कामाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी सरपंच सौ दैवशाला काळे उपसरपंच तसेच पंचायत समितीचे माजी सभापती सदाशिव कदम मांजरा साखर कारखान्याचे संचालक अशोक काळे संजय ढोक युवराज ढोक जगन्नाथ ढोक सुग्रीव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या