६ लाख ३१ हजार ५५१ व्या साखर पोत्याचे
ना. अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख
यांच्या हस्ते पूजन, विलास कारखाना गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल सुरू
कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे
लवकर गाळप होईल यादृष्टीने नियोजन करावे
ना. अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी शनिवार दि. २९ जानेवारी २२:
राज्याचे वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि सर्व संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत विलास सहकारी साखर कारखाना ली.च्या चालू गळीत हंगामातील ६ लाख ३१ हजार ५५१ व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे लवकरात लवकर गाळप होईल यादृष्टीने नियोजन करावे व त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशा सूचनाही याप्रसंगी ना. देशमुख यांनी दिल्या आहेत.
यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरूनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, अनिल पाटील, रजीत पाटील, गोविंद डूरे, सुर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर आदीसह कारखान्यातील खातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
साखर पोतीच्या पूजनानंतर विलास सहकारी साखर कारखानाच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व ना. अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत संचालक मंडळ व विभाग प्रमुखांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत कारखाना अधिकाधिक कार्यक्षमतेने चालवून दररोज जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे निर्देश ना. देशमुख यांनी यावेळी दिले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.