अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषणाचा पहिला दिवस*

 *अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषणाचा पहिला दिवस*




लातूर: विविध कार्यालयात होत असलेले भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तक्रारी देऊनही तक्रारीची अद्याप दखल घेत नसल्याने नाईलाजास्तव बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे दि.21/02/2022 व दि.07/03/2022 रोजी वेगवेगळ्या तक्रारी देण्यात आले.

तक्रारीतील मागण्या.

1)शिवणी (बु) ता.औसा येथे ग्रा.पं. रेकॉर्ड मध्ये खाडाखोड करून बेकायदेशीर शिपाई पद भरती करणाऱ्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करावे व दिलेली शिपाई पद भरती रद्द करावे.

2) जमहूर माध्य.उर्दू शाळा उदगीर येथे कार्यरत शिक्षिका दायमी अंजुम यांनी खोट्या टीसी आधारे डी.एड व बी.ए. चे शिक्षण घेऊन शासनाची फसवणूक करून नौकरी मिळविल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करावे.

3) 26 वर्षापासून एकाच ठिकाणी न.प. निलंगा येथे नोकरी करणाऱ्या अभियंता कैलास वारद यांची विभागीय चौकशी करून सेवेतून बडतर्फ करावे.

4) इनामी जमिनीची निलंगा न.प. येथे बेकायदेशीर नोंद घेणाऱ्या मुख्याधिकारी सुंदर बोदर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावे.

5) वक्‍फ बोर्डाच्या जमिनीचे रक्षण करण्याऐवजी विल्हेवाट लावणाऱ्या जिल्हा वक्फ अधिकारीची ईडी, सीबीआय व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करून सेवेतून बडतर्फ करावे.

6) निलंगा येथील सर्वे नं.291 मधील इनामी जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतर करणाऱ्या ईस्माईल लदाफ व जमीरोद्दीन लदाफ यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे.

7) आरोपीला वाचविण्यासाठी निलंगा न.प. मुख्याधिकारी सुंदर बोदर यांनी जिल्हाधिकारी यांना खोटा अहवाल देऊन शासनाची व अर्जदाराची फसवणूक करणाऱ्या मुख्यधिकारी विरुद्ध एफआयआर दाखल करावे.

वरील दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जो पर्यंत दोषीं विरुद्ध गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषणास जिल्हाधिकार्यालय लातूर येथे दि.28 मार्च 2022 रोजी दुपारी 2:00 वाजे पासून बेमुदत आमरण उपोषणास बसण्यात आले असे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी माहिती दिली. उपोषण कर्ते अल्पसंख्याक मराठवाडा उपाध्यक्ष शेख आजीम, व्यंकट वाघमारे, नारायण पांढरे, कासीम जमिनदार हे उपोषणात उपस्थित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या