औसा शहरातील विविध भागात होत असलेले विकास कामे दर्जेदार करा: सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील नगर परिषद अंतर्गत होत असलेले विकास कामे दर्जेदार करा व तसेच तहसील कार्यालय ते हजरत सुरतशा शाळेपर्यंत प्रभाग क्रमांक 5 मधील पाईप लाईन दुरुस्त करून रस्त्यांची कामे करा,या मागणीसाठी एम आय एमच्या वतीने 24 मार्च 2022 गुरूवार रोजी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले.या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे औसा शहरात नगरपालिकेच्या वतीने विविध योजने अंतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागात होत असलेली कामे ही अंदाजपत्रका नूसार होत नाहीत.तसेच अभियंता गैरहाजर असताना काम होत आहे.वारंवार पालिकेला सूचना देऊनही नगरपालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने शहराला लाखो रूपयांचा निधी येऊन कामाचा दर्जा हा निकृष्ट आहे.सद्या नगरपालिकेवर प्रशासक असून शासनाचे लक्ष देणे गरजेचे असताना शासनाची उदासिनता दिसून येत आहे.तसेच तिसरा टप्याचे काम गतीने करण्यात यावे व शहरात ब-याच ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहेत.ते काम दर्जेदार करण्यात यावे.व शासनाच्या योजनेअंतर्गत होत असलेले घर बांधकाम अतिक्रमण करण्यात येत आहे.वारंवारही मागणी करुन नगरपालिका दुर्लक्ष करित आहे.तसेच औसा शहरातील तहसिल कार्यालय ते हजरत सुरतशा शाळेपर्यंत नवीन रस्त्याचे काम चालू असून सदर रस्त्यावर असलेली पाण्याची पाईपलाईन लिकेज आहे सदरील पाईपलाईन दुरुस्त केल्याशिवाय काम करण्यात येऊ नये.जसे जेणेकरून रस्ता चांगला व मजबूत होईल.तरी सदरील कामाची आपल्या स्तरावरून योग्य ती दखल घेऊन काम करण्यात यावे, अन्यथा तिवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा एम आय एम चे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.