पोलिसांची परवानगी घेऊनच धार्मिक स्थळावर स्पीकर/ भोंगे लावण्याबाबत लातूर पोलिसांचे आवाहन*


पोलिसांची परवानगी घेऊनच धार्मिक स्थळावर स्पीकर/ भोंगे लावण्याबाबत लातूर पोलिसांचे आवाहन








लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

   दिनांक 29/04/2022  रोजी पोलीस ठाणे गांधी चौक येथे गांधी चौक पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सदर इफ्तार पार्टीस पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, परिविक्षाधीन जिल्हाअधिकारी श्री.जतिन रहमान,महानगरपालिकेचे आयुक्त श्री.अमन मित्तल, मुख्याधिकारी श्री.गोयल  उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे  पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकुडे ,संजीवन मिरकले हे उपस्थित होते. तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

               सध्या सुरू असलेल्या भोंगा, स्पीकर वादाच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षकांनी नागरिकांना खालील प्रमाणे सूचना व मार्गदर्शन केले आहेत.

👉 कायद्याच्या तरतुदी मध्ये काही गोष्टीला बंधन आहेत तर काही गोष्टींवर बंधन नाहीत त्यासाठी परवानगी लागते,ही परवानगी असेल तर आपण समर्थपणे  प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकतो.

👉 सध्या भोंगा या विषयावरून काही ठिकाणी वाद निर्माण होतोय तर काही लोक आक्षेप नोंदवत आहेत. काही लोकांना त्याबद्दल शंका आहे.

👉 कायद्यातील तरतुदीचा सर्वांनी अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते सुप्रीम कोर्टाच्या निर्णया प्रमाणे स्पीकर वापरण्यावर बंदी नसून स्पीकर भोंगा च्या आवाजाची मर्यादा किती असावी याच्या वरती आहे. आणि त्यासाठी अधिकृत प्रशासनाकडून परवानगी असणे गरजेचे आहे.

👉🏿 त्यामुळे लातूर पोलिस प्रशासन सगळ्यांना आवाहन करत आहे की,  कुठलेही धार्मिक स्थळ असतील प्रार्थनास्थळ असतील जसे जैन मंदिर, चर्च, मंदिर , बुद्ध विहार, मज्जिद, ईदगाह मैदान अशी कुठल्याही प्रकारचे धार्मिक स्थळातील स्पीकर लावण्यासाठी पोलिसांकडील उपलब्ध परवाना फॉर्म भरावा. त्यांना  पोलिस प्रशासनाच्या वतीने स्पीकर, भोंगा वाजवण्यासाठी नियम व अटी च्या अधीन राहून परवानगी देण्यात येणार आहे.

👉🏿 त्याच्यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे संबंधितांनी परवानासाठीचा फॉर्म मधील माहिती व्यवस्थित भरून पोलीस प्रशासनाकडे द्यायची आहे. पोलीस  तात्काळ त्या अनुषंगाने त्यांची परमिशन सर्वांना देणार आहेत.

👉🏿 संबंधितांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सदर चा फॉर्म भरून दिल्यास त्यांना  परमिशन देण्यात येईल 

👉🏿एका विशिष्ट समाजाच्या एखाद्या प्रार्थनास्थळ आला परमिशनची आवश्यकता असेल किंवा स्पीकरची आवश्यकता भासेल असे नसून सर्वच प्रकारच्या धार्मिक प्रार्थना स्थळांना स्पीकर भोंगा परवान्याची  आवश्यकता भासणार आहे. तरी संबंधितांनी जवळच्या पोलीस ठाणे मधून तात्काळ परमिशन मिळवून घ्यावी असे. आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या