गिरीष इळेकर तर्फे इफ्तार पार्टी

 गिरीष इळेकर  तर्फे इफ्तार पार्टी










औसा मुख्तार मणियार

औसा येथे रमजानच्या पवित्र महिन्यांमध्ये इफ्तार पार्टीच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने सर्व समाजातील बांधवांना एकत्रित करून पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन येथील गिरीष इळेकर व इळेकर परिवाराच्या  वतीने औसा शहरातील महाराज गल्ली येथील गुरु कृपा निवास्थानी गांधी चौक येथे आज दिनांक 29  एप्रिल 2022 शुक्रवार रोजी सायंकाळी 6 :45 वाजता यावर्षी दावत-ए - इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.गेल्या दोन वर्षांत कोव्हीडने हाहाकार माजला होता, त्यामुळे काहीही कोणत्याही कार्यक्रमास शासनाकडून परवानगी देण्यात आली नव्हती. सर्वत्र कार्यक्रमास बंदी घालण्यात आली होती. यावर्षी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत पवित्र रमजान महिन्यात 2022 च्या इफ्तार पार्टीला शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना गिरीष इळेकर व इळेकर परिवाराच्या वतीने ‌ ‌ह  से  हिंदु, म से  मुसलमान ... और हमसे सारा हिंदुस्थान ...हे  ब्रिद वाक्य घेऊन सर्व मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीस निमंत्रित करण्यात आले होते.पवित्र रमजान महिन्यातील 27 वा रोजा ( उपवास)  शुक्रवार दिवशी इप्तार पार्टी झाली.यावेळी या इप्तार पार्टीत प्रामुख्याने  मौलाना इरफान सौदागर, एडव्होकेट समीयोद्दीन पटेल,वसीम भैय्या खोजन,सनाऊल्ला दारूवाले,खाजाभाई शेख,अंगद कांबळे, राजेंद्र बनसोडे, आदि मित्रगण व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या इफ्तार पार्टीत गिरीष इळेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दावत-ए-इफ्तार पार्टीत सर्व मुस्लिम बांधव व मित्रगण येऊन उपस्थित राहिल्याबद्दल गिरीष इळेकर यांनी आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या