*नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार*
आज दिनांक 30/04/2022 रोजी लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये प्रदीर्घ सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या तीन पोलीस अमलदार व एक पोलीस अधिकारी यांचा सत्कार पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांच्या हस्ते करण्यात आला.
सेवानिवृत्त होणाऱ्या मध्ये
पोलीस उपनिरीक्षक व्यंकट तुकाराम पडीले, सहाय्यक फौजदार राम भगवान निकम, सुरेश गुंडेराव कुलकर्णी,वेंकट मारुती वंजारे यांचा शाल, श्रीफळ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
पोलिस अधीक्षकांनी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, पोलीस अमलदार बिराजदार व इतर अधिकारी, अमलदार उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.