प्रत्येक धर्माचा सन्मान व जगातील प्रत्येक माणसाला न्याय म्हणजे खर राष्ट्रप्रेम : पोलीस आयुक्त हरिष बैजल
सोलापूर पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी आपल्या घरी केले लहान मुलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन
सोलापूर- प्रत्येक धर्माचा सन्मान करणे व जगातील प्रत्येक माणसाला न्याय देणे हेच खरं राष्ट्रप्रेम आहे व। लहान मुले आपली खरी राष्ट्र संपत्ती आहेत असे उदगार पोलीस आयुक्त हरिश बैजल यांनी आपल्या घरी आयोजित केलेल्या लहान मुलांसाठी इफ्तार पार्टीत व्यक्त केले.
सध्या रमजानच्या उपवास सुरू असून यात प्रत्येक मुस्लिम बांधव उपवास करत असतात याचे औचित्य साधून सोलापुरात प्रथमच खास लहान मुलांसाठी सोलापूर पोलीस आयुक्त तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन पोलीस आयुक्तालय निवासस्थानी करण्यात आले होते. सामाजिक सलोखा मजबूत करून स्नेह व आपुलकी चे वातावरण निर्माण व्हावे यासाठी इफतारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक आसिफ इक्बाल यांनी सांगितले की आज सर्वत्र मोठ्यांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करतात पण आयुक्त साहेबांनी लहान मुलांसाठी इफ्तारचे आयोजन करणे हे सर्वांसाठी चांगले उदाहरण आहे.
या इफ्तार पार्टीत पोलीस आयुक्त हरिश बैजल, उपायुक्त वैशाली कडुकर, उपायुक्त बापु बंगारसाहेब व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे पहिली व दुसरीत शिकणारे विद्यार्थी ही उपास करतात. ही बाब पोलीस आयुक्तांना घरटे पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्या कडून माहित झाली त्यांनी लगेच लहान मुलांना माझ्या घरी उपसा सोडण्यासाठी या असे आमंत्रण दिले. या इफ्तार पार्टीचे आयोजन खुप चांगल्या प्रकारे करण्यात आले होते. समीर सय्यद यांनी दुआ मागितली. साद शेख यांनी नमाज पठण केले तर इब्राहिम शेख यांनी अज़ान दिले.
यावेळी एजाज मुजावर, आफताब शेख, इक्बाल बागबान, आसिफ इक्बाल, सादेका शेख, आकिद शेख, मुश्ताक गदवाल, समिर निचलकर, आफरीन पठाण , इरफान पटेल, शबाना काझी, रेहाना शेख, रिझवाना प्यारे, विकारुन्निसा बंदुकवाला आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित असलेले लहान मुलांच्या पालकांनी सुध्दा ही पार्टीचे आयोजन केल्याबद्दल आयुक्तसाहेबांचे खुप कौतुक केले व आभार मानले. यावेळी मोठ्या प्रमाणत पोलीस अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.