*10 लाख 70 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त.10 व्यक्तीविरोधात 03 गुन्हे दाखल. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम व परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांची कारवाई.*
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
या बाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम ,उपविभागीय पोलिस अधिकारी,चाकूर यांनी परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक श्री.अभयसिंह देशमुख तसेच उपविभागीय कार्यालय व चाकूर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून चाकूर पोलीस उपविभागातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
त्याप्रमाणे उपविभाग चाकूर हद्दीमधील अवैध धंदेची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याकरिता अवैध धंद्याची माहिती काढत असताना पोलीस पथकास बातमीदारां कडून खात्रीशीर माहिती मिळाली की, चाकूर शहरातील परिसरामधील काही इसम प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची व्यवसाय विक्री करीत आहेत.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहनिशा करून परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक श्री अभयसिंह देशमुख यांनी पोलिस ठाणे चाकूर येथील पोलिस अधिकारी व अमलदारांच्या पथकाने गोपनीय माहिती मधील एकूण 10 इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे कडून शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे, महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटका व सुगंधित पानमसाला असा एकूण 10 लाख 70 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू जत करण्यात आले आहे.
त्यावरून सहाय्यक आयुक्त कार्यालय, लातूर येथील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे चाकूर येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारे इसम नामे
1)ओमकार मलिकार्जुन कालवणे, वय 41, वर्ष राहणार हंडळगुळी.
2) रोशन वजीर साहेब तांबोळी, वय 47 वर्ष, राहणार तांबोळीगल्ली, हळी तालुका उदगीर
3) सुनील तातेराव माचेवाड वय 30, वर्ष, राहणार हंडरगुळी तालुका उदगीर.
4) विष्णू जनार्दन हमदळे, वय 22 वर्षे, राहणार हंडरगुळी तालुका उदगीर.
5) रामदास निवृत्ती चीनतलवार, वय 45 वर्ष, राहणार हंडरगुळी तालुका उदगीर.
6) गंगाधर दशरथ सोमवंशी, वय 40 वर्ष, राहणार सोसायटी चौक, चाकूर.
7) राजेश्वर दशरथ सोमवंशी वय 57 वर्ष, राहणार सोसायटी चौक, चाकूर.
8) तिरुमल प्रल्हाद माने, वय 29 वर्ष राहणार चाकूर.
9) अहमद इस्माईल लालूभाई शेख, वय 34 वर्षे, राहणार लिंबूनिगल्ली चाकुर.
10) गफूर इस्माईल लालूभाई शेख, वय 31 वर्ष, राहणार लिंबूनिगल्ली चाकूर. यांच्यावर पोलीस ठाणे चाकूर येथे
1) गुन्हा रजिस्टर क्रमांक 214/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानदे अधिनियम 2006 कलम-59.
2) गुन्हा रजिस्टर क्रमांक 215/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानदे अधिनियम 2006 कलम-59.
3) गुन्हा रजिस्टर क्रमांक 216/ 2022, कलम 328,188, 272, 273 भा.द.वि. तसेच अन्नसुरक्षा आणि मानदे अधिनियम 2006 कलम-59.
याप्रमाणे गुन्हे दाखल करून सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक फड हे करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, सहायक पोलिस अधीक्षक श्री.निकेतन कदम, परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक श्री. अभयसिंह देशमुख यांचे नेतृत्वात चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस उप- निरीक्षक तुकाराम फड, दामोदर शिरसाट,साहेबराव हाके,सुरेश कलमे, बाळू अरद्वाड,गोविंद बोळेगे, पिराजी पुट्टेवाड,सुकेश केंद्रे,अंबादास पाटील, महेश चव्हाण,हनुमंत मस्के,महिला पोलीस अमलदार हाश्मी यांनी पार पाडली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.