हासेगाव फार्मसी चे प्रो. डॉ एन बी लोणीकर यांचे पेटंट प्रकाशित .
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ . एन बी लोणीकर यांच्या पेटंटला मान्यता प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयात सत्कार सोहळा करण्यात आला .यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर अप्पा बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक आत्माराम मुलगे इत्यादी मंचावर उपस्थित होते . भारतीय पेटंट कार्यालय , भारत सरकार कडून "novel thiazolidinone and azetidinone compounds and method for synthesis there of " या संशोधना वरती ०३/०६/२०२२ रोजी हे पेटंट प्रकाशित झाले आहे. सदरील पेटंट हे नैराश्य व इतर मेंदूवरील आजारवरती औषध म्हणून कार्य करते . या पेटंट संशोधनामध्ये प्रा डॉ भुसनुर ओ जी , प्रा. डॉ गिराम पी एस व प्रा सोनवणे एस. एम. यांचे अनमोल सहकार्य लाभले
या बद्दल डॉ . एन बी लोणीकर यांना मान्यवरांच्या हस्ते शॉल आणि सन्मान चिन्न देऊन सन्मानित करण्यात आले . ज्ञानसागर विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री कालिदास गोरे , लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर चे प्राचार्य श्री नंदकिशोर बावगे , लातूर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ श्यामलीला बावगे,(जेवळे ) राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज चे प्राचार्य श्री संतोष मेदगे ,लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरॅपीचे प्राचार्य डॉ वीरेंद्र मेश्राम , लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था चे प्राचार्या सौ. योगिता बावगे लातुर कॉलेज ऑफ सायन्स चे प्राचार्य श्री चौधरी एम शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी प्रो. डॉ एन बी लोणीकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.