सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या निवासस्थानी सद्गुरु गुरुबाबा महाराज यांचा सत्कार
औसा (प्रतिनिधी) दि.१०
औसा येथील नाथ संस्थानचे पाचवे पीठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांनी भागवत धर्माचा प्रसार करण्याचे कार्य हाती घेत असताना आपल्या भजन प्रवचन आणि दिव्य चक्री भजनाच्या माध्यमातून समाज जागृती चे कार्य हाती घेतले आहे. मागील अनेक वर्षापासून सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर हे विविध उपक्रमाच्या माध्यमातून अध्यात्माचे कार्य करतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने यावर्षीचा संस्कृतीक कार्याबद्दलचा पुरस्कार त्यांना दिला असून हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांचा आपल्या निवासस्थानी सपत्नीक सत्कार केला. यावेळी सौ सुवर्णाताई देशमुख जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे श्री लक्ष्मणराव मोरे, रोजगार हमी योजना समितीचे माजी अध्यक्ष उदयसिंह देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.लातूर येथील आशियाना या निवासस्थानी सद्गुरु गुरुबाबा महाराज यांनी सदिच्छा भेट दिल्यामुळे हा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.