*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी विशाल पवार यांची निवड*
*पत्रकार संघटनेकडून वाढदिवसानिमित्त अनोखी भेट*
नांदेड/प्रतिनिधी
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी दैनिक महानगरी टाइम्स व दैनिक आनंद नगरी या वृत्तपत्राचे विशाल पवार यांची निवड करण्यात आली आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संघाच्या नांदेड जिल्हा, मराठवाडा विभागावर उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याने त्यांची राज्य उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. विशाल पवार संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत व करीत राहतील. त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक 30 जून, 2023 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत असून पुढील कार्य पाहून बढती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.