औसा तहसील मधील स्वच्छतागृह बंद;नागरिकांची गैरसोय

 औसा तहसील मधील स्वच्छतागृह बंद;नागरिकांची गैरसोय





औसा-औसा तहसील कार्यलयामधील स्वच्छतागृह कुलूप बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.तर महिलांची ही मोठी अडचण होत असल्याचे चित्र पावसात अशील मध्ये दिसून येत आहे. पुरुष कोठेही जाऊन लघुशंका करू शकतो परंतु महिलांनी तेही वयोवृद्ध महिला या ठिकाणी सर्व कागदपत्रे काढण्यासाठी येतात त्यांनी त्यांचे नैसर्गिक विधी कुठे करायचा हे मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याची चर्चा आहे.



औसा शहरात तहसील कार्यालय हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे. या ठिकाणी सर्व शासकीय प्रमाणपत्र मिळतात आणि महसुली विभाग असल्याने नागरिकांची हजारोच्या संख्येने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

यामुळे नागरिकांना स्वच्छतागृह असणे अत्यावश्यक बाब आहे कारण शारीरिक आणि नैसर्गिक विधी लघुशंका उरकण्यासाठी या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही जे स्वच्छतागृह आहे ते कुलूप बंद आहे.

यामुळे नागरिक आपली आवश्यकता कोठेही उभा टाकून उघड्यावर लघुशंका करताना मोठ्या पुरुष मंडळी प्रमाणात दिसत आहेत.



यामुळे तहसील परिसरातील वातावरणही दुर्गंधीयुक्त झाल्याचे तळमजल्यावर आणि पार्किंगच्या बाजूने गेल्यानंतर दिसून येते.

 त्यामुळे औसा तहसीलदार यांनी नागरिकांची अत्यावश्यक असणारी गरज लक्षात घेऊन सदरील कुलूपबंद स्वच्छालय स्वच्छ करून ते नागरिकासाठी वापरात आणावे अशी मागणी नागरिक कडून केली जात आहे.

【  】औसा तहसील कार्यालयामधील स्वच्छता ग्रह कुलूपबंद असले बाबत ची माहिती घेण्यासाठी औसा तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष बी जी सोनवते यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या