औराद बाजार समितीच्या वतीने संतोष सोमवंशी यांचा सत्‍कार

 औराद बाजार समितीच्या वतीने संतोष सोमवंशी यांचा सत्‍कार





:-निलंगा तालुक्यातील औराद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने संतोष भाऊ सोमवंशी यांची महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल सरपंच मोहनराव भंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषी भुषण सुभाष मुळे होते 

यावेळी मोहनराव भंडारे यांनी बाजार समितीच्या भौगोलिक अडचणी सरकारच्या माध्यमातून दुर कराव्यात अशी मागणी केली 

संतोष सोमवंशी यांनी बाजार समिती चे कार्यालय स्वतः च्या जागेत करण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच बाजार समिती ला स्वतः ची जागा खरेदी करण्यासाठी प्रयत्न करणार असे मत व्यक्त केले

 यावेळी प्रशासक हाजी सराफ,प्रशासक संजय बडूरे, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, सचिव सतीश मरगणे औसा बाजार समिती सचिव संतोष हुच्चे, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, सावरी सरपंच वाघजी पाटील औराद सोसायटी चेअरमन लक्ष्मण बोंडगे, व्हाईस सौलानी नाईकवाडे, पांडुरंग भंडारे सतीश देवणे राहूल मोरे कैन्हया पाटील यांच्या सह व्यापारी शेतकरी हमाल मोठय़ा संख्येने उपस्थित होते




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या